

नाश्त्याला रोज काय बनवायचं हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. रोज कांदे पोहे, उपमा, उत्तप्पा, मेदू वडे खाऊन लोक कंटाळतात. त्यामुळे त्यांना काहीतरी कमीवेळेत तयार होणारं आणि चवीला उत्तम असा नाश्ता हवा असतो. पुढे आपण एक अशीच भन्नाट रेसिपी जाणून घेणार आहोत. ही रेसिपी पूर्णपणे तांदळाची असणार आहे. याने पोट भरलेलं राहतं आणि लोक सहसा यासोबत तिखट किंवा लाल चटणी किंवा नारळाची चटणी खातात.
अर्धा कप पाणी
अर्धा चमचा मीठ
पाव चमचा तूप
१ कप तांदळाचे पीठ
फोडणीसाठी लागणारे साहित्य
२ चमचे तेल
१ टीस्पून मोहरी
१ चमचा चणा डाळ
१ चमचा उडीद डाळ
२ चमचे तीळ
१ सुकी लाल मिरची
चिमूटभर हिंग
काही कढीपत्ता
१ मिरची बारीक चिरलेली
१ इंच आलं बारीक चिरलेलं
२ मोठे चमचे कोथिंबीर
सर्वप्रथम एका मोठ्या कढईत पाणी, मीठ आणि तूप घालून ते चांगले उकळू द्या. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात तांदळाचे पीठ घालून सतत ढवळत राहा, जेणेकरून गाठी होणार नाहीत. पाणी पूर्णपणे शोषलं जात नाही, तोपर्यंत मिश्रण शिजवा आणि नंतर झाकण ठेवून मंद आचेवर दोन मिनिटे ठेवून द्या.
पुढे हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्या आणि थोडं थंड झाल्यावर ओल्या हाताने मऊ व गुळगुळीत पीठ मळून घ्या. त्याचे लहान-लहान गोळे तयार करा आणि स्टीमरमध्ये सुमारे १० मिनिटे वाफवून घ्या.
आता एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, चणा डाळ, उडीद डाळ, तीळ, सुकी लाल मिरची, हिंग आणि कढीपत्ता घालून छान फोडणी तयार करा. त्यानंतर त्यात हिरवी मिरची आणि आले घालून हलके परता.
पुढे वाफवलेल्या गोळ्या त्यात घालून हलक्या हाताने मिसळा, जेणेकरून त्या तुटणार नाहीत. झाकण ठेवून दोन मिनिटे शिजू द्या, जेणेकरून फोडणीची टेस्ट इडलीमध्ये मुरेल. शेवटी कोथिंबीर घालून गरमागरम गोळी इडली चटणीसोबत सर्व्ह करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.