

शेंगदाण्याच्या दोन सोप्या आणि पौष्टिक रेसिपी मुलांच्या टिफीनसाठी उत्तम पर्याय आहेत.
भाजी आणि पराठा दोन्हीही कमी साहित्यात झटपट तयार होतात.
हिवाळ्यात शेंगदाणे शरीराला उर्जा देतात आणि चवीतही भर घालतात.
हिवाळ्यात शेंगदाणे खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. अनेकदा शेंगदाणे भाजून किंवा स्नॅक्स म्हणून खाल्ले जातात. पण शेंगदाण्यापासून अनेक स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपी सुद्धा तयार करता येतात. त्यात पराठा आणि भाजी या दोन रेसिपी खूप लोकप्रिय आहेत. मुलांच्या टिफीन साठी सोप्या आणि कमी साहित्यात कमी वेळात तयार होणाऱ्या या दोन्ही डिश टिफीनच्या मेन्यूमध्ये छान बसतात. जर तुम्हाला या रेसिपी माहित नसतील, तर ही माहिती नक्की उपयोगी ठरेल.
शेंगदाण्याची भाजी बनवण्यासाठी २ कप शेंगदाणे रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी पाणी काढून घ्या. आता कढई गरम करून त्यात थोडे तेल टाका आणि जिऱ्याची फोडणी द्या. मग टोमॅटो प्यूरी घालून नीट परतून घ्या. त्यानंतर धणे पावडर, हळद, पाव भाजी मसाला घालून दोन मिनिटे मिश्रण शिजू द्या. त्यात भिजवलेले शेंगदाणे, मीठ आणि काळी मिरी टाकून झाकण ठेवून शिजू द्या. चपाती किंवा भातासोबत ही भाजी अप्रतिम लागते.
शेंगदाण्याचा पराठा करण्यासाठी एक कप गव्हाचं पीठ चाळून घ्या आणि पाण्याच्या मदतीने मऊसर पीठ मळून काही वेळ बाजूला ठेवा. पराठ्यासाठी भरण तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये शेंगदाणे, चना डाळ आणि कडीपत्ता घालून छान परतून घ्या. सुगंध आला की गॅस बंद करा आणि मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यात लाल मिरची, हिंग, धणे पावडर आणि मीठ घालून सारण तयार करा. आता पिठाचे गोळे करून, त्यात हे सारण भरा आणि पराठे तयार करा. बटाटाच्या पराठ्या प्रमाणे हे लाटून घ्या. दोन्ही बाजूंनी तूप किंवा तेल लावून पराठे भाजून घ्या आणि गरमागरम सर्व्ह करा. थंडीत खाण्यासाठी शेंगदाण्याचे हे दोन्ही पदार्थ चवीला मस्त लागतात तितकेच पौष्टिकही असतात. मुलांनाही हे पदार्थ आवडतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.