Jowar vs Bajra Bhakri: ज्वारी की बाजरी, वजन कमी करण्यासाठी कोणती भाकरी योग्य?

Sakshi Sunil Jadhav

ज्वारीची भाकरी

वजन कमी करण्यासाठी अनेक लोक गहू टाळून मिलेट्सचा वापर वाढवत आहेत. त्यात ज्वारीची व बाजरीची भाकरी सर्वाधिक लोकप्रिय आहे. पण नेमकं वजन कमी करण्यासाठी कोणती भाकरी जास्त फायदेशीर आहे? आहारतज्ज्ञांच्या मते दोन्ही भाकऱ्यांचे फायदे वेगवेगळे असतात आणि शरीराच्या गरजेनुसार त्यांची निवड करावी.

jowar vs bajra bhakari

तज्ज्ञांचे मत

तज्ज्ञ सांगतात की वजन कमी करण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल खेळते ती फायबरची मात्रा, ग्लायसेमिक इंडेक्स आणि पचनाची गती. या आधारावर पाहता ज्वारी आणि बाजरी दोघींनाही वजन कमी करण्यामध्ये चांगला फायदा आहे; मात्र काही परिस्थितीत ज्वारी थोडी जास्त प्रभावी ठरते.

jowar vs bajra bhakari

ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी

ज्वारीचा GI बाजरीपेक्षा थोडा कमी असल्याने रक्तातील साखर जलद वाढत नाही. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

jowar vs bajra bhakari

खनिजे आणि कॅल्शियम

बाजरीची भाकरी हाडे मजबूत ठेवते आणि दीर्घकाळ ऊर्जा देते, त्यामुळे वजन कमी करताना थकवा जाणवत नाही.

jowar vs bajra bhakari

ज्वारीमधील फायबर

जास्त फायबरमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे अनावश्यक खाणे कमी होते.

jowar vs bajra bhakari

बाजरीची पचनाची पद्धत

बाजरी हळू पचते, त्यामुळे भूक कमी लागते. वजन कमी करताना हे मोठे प्लस पॉइंट आहे.

jowar vs bajra bhakari

डायजेशन सेंसिटिव्ह

अॅसिडिटी, गॅस किंवा पचनाचा त्रास असल्यास ज्वारीची भाकरी जास्त हलकी व फायदेशीर.

jowar vs bajra bhakari

बाजरी शरीर गरम ठेवते

थंडीत वजन कमी करताना बाजरी भाकरी उत्तम काम करते, कारण ती मेटाबॉलिझम वाढवते.

jowar vs bajra bhakari

ज्वारी ग्लूटेन-फ्री

ग्लूटेन टाळणाऱ्यांसाठी ज्वारी सुरक्षित आणि वजन कमी करण्यासाठी एक आरोग्यदायी पर्याय.

jowar vs bajra bhakari

भाकऱ्यातील घटक

ज्वारी-बाजरी दोन्ही नैसर्गिक, प्रक्रिया न केलेले कार्ब्स देतात, जे शरीराला वजन कमी करतानाही ऊर्जा देतात. जास्त फायबर, कमी GI आणि हलके पचन त्यामुळे ज्वारी वजन कमी करण्यासाठी थोडी 'बेस्ट' निवड मानली जाते.

jowar vs bajra bhakari

NEXT: वरण भात खाऊन कंटाळलात? मग ही खोबऱ्याची चटपटीत चटणी करून पाहाच

traditional coconut chutney
येथे क्लिक करा