Kidney Symtoms: रात्री झोप न येण्याचं कारण असू शकतं किडनी खराब झाल्याचं लक्षण, वेळीच व्हा सावध

Sleep Problems: किडनी नीट काम न केल्यास रक्तातील विषारी पदार्थ वाढतात आणि झोपेवर परिणाम होतो. सततची अनिद्रा, पायातील अस्वस्थता, स्लीप एपनिया ही किडनी खराब होण्याची सुरुवातीची महत्त्वाची लक्षणे असू शकतात.
kidney damage signs
kidney symptomssaam tv
Published On
Summary

किडनी खराब झाल्यास रक्तातील टॉक्सिन्स वाढतात आणि झोपेवर परिणाम होतो.

रेस्टलेस लेग सिंड्रोम व स्लीप एपनिया ही किडनी आजाराची महत्त्वाची लक्षणे आहेत.

सतत झोप मोड होत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

किडनी आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्यामुळे किडनीचे आरोग्य चांगले ठेवण्याचे कार्य आपण केले पाहिजे. त्याने शरीर संतुलित राहण्यास खूप मदत होते. किडनी आपल्या शरीरात फिल्टर प्लांट प्रमाणे कार्य करत असते. जर हे काम बंद झालं किंवा यात काही बिघाड झाला तर तुमच्या आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होतो. त्यामुळे तुम्हाला तुमचा जीव सुद्धा गमवावा लागू शकतो. याची काही लक्षणे सुरुवातीला आपल्याला मिळत असतात. त्यातलं सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे रात्री झोप न लागणे.

किडनी शरीरातील महत्वाचा भाग का आहे?

अमेरिकेतील नॅशनल किडनी फाउंडेशन (NKF) च्या माहितीनुसार किडनी शरीरातील केमिकलचा बॅलन्स नियंत्रित ठेवण्याचे काम करते. शरीरातील जवळपास 200 लिटर रक्त हे दररोज फिल्टर करून त्यातील विषारी घटक बाहेर काढण्याची प्रक्रिया किडनी पार पाडते. अशा परिस्थितीत जर किडनी आजारी पडली तर शरीर अनेक संकेत देतं. रात्री नीट झोप न येणे किंवा वारंवार झोप मोडणे हेही त्यापैकी एक लक्षण आहे. क्रॉनिक किडनी डिसीज (CKD) असलेल्या निम्म्याहून अधिक रुग्णांना झोपेच्या समस्या जाणवत असल्याचे आढळले आहे.

kidney damage signs
Jowar vs Bajra Bhakri: ज्वारी की बाजरी, वजन कमी करण्यासाठी कोणती भाकरी योग्य?

रक्तात विषारी पदार्थ जमा होणे.

किडनी नीट काम न केल्यास रक्तातील विषारी पदार्थांसारखे युरिया आणि क्रिएटिनिन बाहेर न जाता रक्तातच जमा होतात. हे टॉक्सिन्स शरीराच्या आराम करण्याच्या क्षमतेत अडथळा निर्माण करतात. परिणामी झोप लागणं कठीण होतं आणि रात्रभर जाग येत राहते. किडनीच्या रुग्णांमध्ये रेस्टलेस लेग्स सिंड्रोम ही तक्रारही मोठ्या प्रमाणात दिसते. ही एक न्यूरोलॉजिकल समस्या असते. यामध्ये पायात मुंग्या येणे, झिणझिण्या येणे किंवा अस्वस्थता निर्माण होण्याच्या समस्या आढळतात. यामुळे सतत पाय हलवावेसे वाटतात. ही समस्या रात्री जास्त वाढते आणि झोपण्यास अडथळा निर्माण होतो.

याशिवाय किडनी आजार असलेल्या रुग्णांमध्ये स्लीप एपनिया ही समस्या देखील सर्वसाधारणपणे दिसते. झोपेत श्वास कधी सुरू होतो तर कधी अचानक थांबतो, अशा स्थितीत रुग्ण रात्री अनेकदा जागा होतो. सकाळी उठल्यावर थकवा जाणवणे, दिवसभर अशक्तपणा येणे ही लक्षणे दिसतात. रात्री झोप न येणे ही अनेक कारणांमुळे होणारी सामान्य समस्या असू शकते. मात्र जर हे लक्षण सतत जाणवत असेल तर किडनी तपासणे आवश्यक ठरते. योग्य वेळी उपचार घेतल्यास किडनीला मोठे नुकसान टाळता येऊ शकते.

kidney damage signs
Kothimbir Vadi Tips: कोथिंबीर वडी नरम होते, आतून कच्ची राहतेय? मग वापरा ही एक ट्रिक, खमंग कुरकरीत होतील वड्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com