खरवस म्हटले की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. परंतु, या पदार्थाची चव आतापूर्वी सारखी चाखयला मिळत नाही. त्यामुळे अगर वापरुन हा खरवस बनवले जाते.
चिकाच्या दुधाशिवाय जर तुम्हाला मऊ जाळीदार खरवस बनवायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करु शकता. काहींना हा खरवस गावी गेल्यावरच खायला मिळतो. त्यामुळे चिकासाठी वाट बघत बसण्यापेक्षा घरात बनवा इन्स्टंट खरवस. झटपट कसे बनवायचे हे पाहूया.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सर्वप्रथम खोबऱ्याचे बारीक तुकडे करुन घ्या. कपभर पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या.
मिश्रण घट्ट होईल. नंतर एका भांड्यात रुमाल ठेवून वाटलेल्या खोबऱ्याचे मिश्रण गाळून घ्या.
नारळाचे दूध निघाल्यानंतर पाव कप कॉनफ्लोअर घ्या. चमचाभर दूध घेऊन त्यात कॉनफ्लोअर मिक्स करा.
नंतर पॅन गरम करुन त्यात दूध घाला. दूधात घोळवलेले कॉनफ्लोअर उर्वरित दूधात चांगले मिक्स करुन घ्या.
सतत ढवळत राहा. प्रमाणानुसार साखर घाला. घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा.
बाउल घेऊन त्याला तूप लावा. तयार मिश्रण त्यात घालून सेट होण्यासाठी ठेवा. व्यवस्थित सेट झाल्यानंतर त्याचे काप करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.