Black Pav Bhaji: घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी स्पेशल ब्लॅक पावभाजी; वाचा सोपी रेसिपी

Mumbai Street Food: ब्लॅक पावभाजी ही काळ्या मसाल्यामुळे विशेष स्वादिष्ट आणि सुगंधी लागते. हॉटेलसारखी टेस्ट घरच्या घरी मिळवण्यासाठी ही खास रेसिपी एकदा जरूर करून पाहा.
Mumbai Street Food
Black Pav Bhaji Recipesaam tv
Published On

मुंबईकरांसाठी जितका वडा पाव प्रिय आहे, तितकीच पावभाजी सुद्धा आहे. पाव भाजी ही सगळ्या मॅश केलेल्या भाज्या, चविष्ठ मसाले आणि भरपूर बटर घालून तयार केली जाते. यामध्ये पाव सुद्धा व्यवस्थित बटर लावून चटपटीत पद्धतीने तयार केले जातात. त्यातच पावभाजीचे विविध प्रकार बाजारात प्रचंड व्हायरल होत आहेत. पुढे आपण त्यातलाच एक प्रकार म्हणजे ब्लॅक पावभाजी घरच्या घरी तेही हॉटेससारखी कशी बनवायची? याबद्दल जाणून घेणार आहोत.

साहित्य

बटाटे, फुलकोबी, मटार, मीठ, पाणी, हिरव्या मिरच्या, आलं-लसूण पेस्ट, तमालपत्र, दालचिनी, वेलची, लवंगा, बडीशेप, धणे, जिरे, तीळ, सुकं नारळ, काळे जिरे, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, बटर आणि कोथिंबीर इ.

Mumbai Street Food
Soft Chapati Tips: चपात्या कडक होतात, फुगतच नाहीत? नेमकी कुठे चूक होते? कणिक मळताना घाला '१' पदार्थ

कृती

सर्वप्रथम बटाटे, फुलकोबी आणि मटार या भाज्या प्रेशर कुकरमध्ये थोडं मीठ आणि पाणी घालून शिजवून घ्या. दरम्यान हिरव्या मिरच्या, आले आणि लसूण यांची पेस्ट तयार करा. आता दुसऱ्या पॅनमध्ये तमालपत्र, दालचिनी, वेलची, लवंगा, बडीशेप, धणे, जिरे, तीळ, सुकं नारळ आणि काळे जिरे असे मसाले मंद आचेवर भाजून घ्या. हे मसाले ग्राइंडरमध्ये बारीक वाटून काळा मसाला तयार करा.

एका पॅनमध्ये थोडं तेल आणि बटर घालून चिरलेला कांदा परतवा. कांदा मऊ झाल्यावर त्यात लसूण-आल्याची पेस्ट घालून २-३ मिनिटं परता. नंतर चिरलेली शिमला मिरची आणि टोमॅटो घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा. आता या मिश्रणात तयार केलेला काळा मसाला घालून छानपणे परता. मसाल्यातून तेल सुटायला लागलं की त्यात मॅश केलेल्या भाज्या घाला.

भाजीचं घट्टपण टिकवण्यासाठी थोडं पाणी घाला आणि मीठ चवीनुसार समायोजित करा. झाकण ठेऊन काही मिनिटं मंद आचेवर शिजवा. शेवटी थोडं बटर आणि कोथिंबीर घालून भजी तयार करा. पाव एका तव्यावर थोडं बटर लावून भाजून घ्या. गरमागरम ब्लॅक पावभाजीवर थोडं बटर आणि कोथिंबीर घालून वाढा. ही भाजी काळ्या मसाल्यामुळे विशेष चविष्ट आणि सुगंधी लागते. हॉटेलसारखी टेस्ट घरच्या घरी मिळवण्यासाठी ही रेसिपी एकदा नक्की करून पाहा.

Mumbai Street Food
Farsan Bhaji Recipe: रोज रोज बटाट्याची भाजी खाऊन कंटाळलात? मग झणझणीत फरसाणची रस्सा भाजी खाऊन पाहाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com