Farsan Bhaji Recipe: रोज रोज बटाट्याची भाजी खाऊन कंटाळलात? मग झणझणीत फरसाणची रस्सा भाजी खाऊन पाहाच

Sakshi Sunil Jadhav

फरसाणची भाजी

रोज रोज त्याच त्या भाज्या बनवून कंटाळा आला असेल तर ही झटपट फरसाणची भाजी एकदम योग्य पर्याय आहे. काही मिनिटांत तयार होणारी ही भाजी खायला तितकीच रुचकरही आहे.

Farsan Bhaji Recipe

आवश्यक साहित्य

फरसाण २ वाट्या, बारीक चिरलेला कांदा, आलं, हळद, लाल तिखट, कोथिंबीर आणि तेल एवढ्याच साहित्यात ही भाजी बनवता येते.

Farsan Bhaji Recipe

फोडणी तयार करा

कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जीरं, आलं, कांदा आणि टोमॅटो टाका. थोडं मीठ घालून परतून घ्या.

Farsan Bhaji Recipe | google

मसाले घाला

मिश्रणात हळद, लाल तिखट, धणेपूड आणि चाट मसाला घालून सर्व एकजीव करून घ्या.

Farsan Bhaji Recipe | google

फरसाण मिक्स करा

तयार मसाल्यात फरसाण घालून हलक्या हाताने मिक्स करा आणि झाकण ठेवा.

Farsan Bhaji Recipe

वाफ काढा

दोन मिनिटं वाफ काढल्यानंतर गॅस बंद करा. फरसाण भाजी तयार होईल. गरमागरम फरसाणची भाजी मऊ चपाती किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करा.

Farsan Bhaji Recipe | google

रस्सा हवाय?

भाजलेला कांदा, सुकं खोबरं, लसूण, आलं आणि मिरचीचं वाटण तयार करा. ते तेलात परतून पाणी घाला आणि फरसाण मिसळा.

Farsan Bhaji Recipe | google

NEXT: सर्वात जास्त ज्यावर प्रेम करतो तोच घात करतो? चाणक्यांनी सांगितलं गुपित

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

motivation success tips | google
येथे क्लिक करा