Sprouted Potatoes Risk : मोड आलेले बटाटे खाताय? आरोग्याला निर्माण होईल मोठा धोका, तज्ज्ञांचा इशारा

Health Tips : मोड आलेले बटाटे खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते त्यातील सोलानाइन घटक उलट्या, जुलाब, पोटदुखी व मज्जासंस्थेवर परिणाम करू शकतो. योग्य साठवण महत्त्वाची आहे.
Potato nutrition awareness
Why avoid green potatoesgoogle
Published On
Summary
  1. मोड आलेल्या बटाट्यांमध्ये सोलानाइन नावाचे विषारी घटक तयार होतात.

  2. अशा बटाट्यामुळे पचनाशी निगडीत त्रास व मज्जासंस्थेला धोका होतो.

  3. बटाटे फ्रीजमध्ये ठेवू नयेत; हवेशीर ठिकाणी साठवा.

  4. हिरवे पडलेले, मऊ व वास येणारे बटाटे लगेच फेकून द्यावेत.

प्रत्येक भारतीय रहिवाशांच्या आहारामध्ये बटाट्याचा समावेश केला जातो. प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात बटाटा हा भाज्यांमधील महत्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे बाजारात गेल्यावर बटाट्याची खरेदी केली जाते. बऱ्याच वेळेस आपण जास्त बटाटे घरात आणून ठेवतो. भाजी, नाश्ता किंवा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र काही वेळाने जेव्हा बटाट्यांना अंकुर फुटतात, तेव्हा ते शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात.

अंकुरलेल्या किंवा मोड आलेल्या बटाट्यांमध्ये "सोलानाइन" नावाचा विषारी घटक तयार होतो. या घटकाचे जास्त प्रमाण शरीरात गेल्यास उलट्या, जुलाब, डोकेदुखी, पोटदुखी, चक्कर येणे आणि गंभीर प्रकरणांमध्ये मज्जासंस्थेला हानी पोहोचवू शकते, असा इशारा तज्ज्ञ देतात.

Potato nutrition awareness
Pitru Paksha 2025 : पितृपक्षात ही एक वस्तु दान करा; पैशांची तंगी आणि पितृदोष होतील दूर

आहारतज्ज्ञ सांगतात की, जर बटाट्याला थोडेसे अंकुर आले असतील आणि त्यावर हिरवे डाग नसतील तर तो वापरता येऊ शकतो. त्यामुळे बाजारातून बटाटे विकत आणताना तुम्ही ही काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, अंकुर व आजूबाजूचा भाग कापून टाकणे आवश्यक आहे. शिजवण्यापूर्वी बटाटा सोलून चांगले धुतल्यास धोका कमी होतो. परंतु जर बटाट्यावर मोठ्या प्रमाणात हिरवे डाग असतील, त्याला वास येत असेल किंवा तो खूप मऊ झाला असेल तर तो अजिबात वापरू नका. त्याने तु्म्हाला पोटासंबंधीत आणखी समस्यांना सामोरे जावे लागेल.

तज्ज्ञांच्या मते, बटाटे थंड, कोरड्या आणि हवेशीर जागी ठेवले पाहिजेत. बटाटे फ्रीजमध्ये ठेवू नयेत कारण ओलावा वाढल्याने अंकुर लवकर फुटतात. तसेच, कांद्यासोबत बटाटे ठेवल्यास कांद्यामुळे निघणाऱ्या वायूमुळेही अंकुर येण्याची प्रक्रिया जलद होते. थोडे अंकुरलेले बटाटे काळजीपूर्वक वापरले जाऊ शकतात, मात्र आरोग्याला निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी खूपच मोड आलेले आणि हिरवे पडलेले बटाटे फेकून देणे योग्य ठरेल.

Potato nutrition awareness
Gokul Milk : कोल्हापूरचा गोकुळ दूध ब्रँड आता आईस्क्रीमसह बाजारात, मोठी घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com