
तूप आणि दुधावरील जाड साय खाणे अनेकांना आवडतं. काही व्यक्ती रोजच्या जेवणात देखील तेल नाही तर तुपाचा वापर करतात. त्यामुळे बहुतेक ठिकाणी दुधापासून घरच्याघरी तूप बनवले जाते. तूप चांगलं आणि जास्त कॉन्टीटीमध्ये बनवण्यासाठी आपल्याकडे जास्त मलई म्हणजेच दूधाची साय साठली पाहिजे. मात्र बऱ्याचदा बाहेरून आणलेल्या दुधावर बारीक आणि पातळ साय येते त्यामुळे छान तूप तयार होत नाही. त्यामुळे आज याबद्दल माहिती जाणून घेऊ.
या पद्धतीने उकळा दूध
दुधाला चांगलं उकळवलं की त्यावर छान साय येते. त्यासाठी तुम्हाला दूध उकळवण्याची योग्य पद्धत काय आहे हे माहित असलं पाहिजे. बऱ्याच महिला एक कॉमन चूक करत असतात. दूध आणल्यावर आपण ते फ्रिजमध्ये ठेवतो. फ्रिजमधील दूध बाहेर काढल्याबरोबर गॅसवर तापण्यासाठी ठेवू नका. कारण असे केल्याने दूध थंड तापमानातून थेट जास्त हिटमध्ये येते आणि दूध खराब होण्याची शक्यता असते.
दूध तापवण्याआधी फ्रिजमधून ते बाहेर काढून ठेवा. दूध नॉर्मल टेंम्प्रेचरला आल्यावर गॅसवर तापण्यासाठी ठेवा. दूध तापत असताना गॅस मिडीअम टू लो फ्लेमवर ठेवा. त्यानंतर गॅस कमी करून ठेवा. बारीक आणि कमी फ्लेमवर सुद्धा दूध आणखी काही मिनिटे तसेच ठेवा. दूध तापत असताना ते काही प्रमाणात आटते. त्यामुळे दूधावर चांगली जाडसर मलई येते.
ही काळजी घ्या
दूध उकळत असताना तुम्हाला योग्य ती काळजी घेणे गरजेचं आहे. त्यासाठी दूध गॅसवर ठेवल्यानंतर ते उकळी आल्यावर उतू जाऊ नये यासाठी त्यात एक लाकडी चमचा ठेवा. दूध मिडिअम फ्लेमवर तापत असताना ते अधून-मधून चमच्याने ढवळत राहा. असे केल्याने दूध छान तापले जाते आणि त्यावर मस्त जाड मलई येते.
घट्ट मलईसाठीची प्रोसेस ऐवढ्यावर संपलेली नाही. दूध जितकं जास्त थंड होईल तितकी जास्त घट्ट मलई तयार होते. त्यामुळे आधी तापवलेलं दूध पुन्हा थंड करून घ्या. नॉर्मल टेंप्रेचरला दूध आलं की ते पुन्हा फ्रिजमध्ये ठेवून द्या. तीन ते चार तासांनंतर दूध पूर्ण थंड होते आणि त्यावर अदगी जाडसर मलई जमा होते. अशा मलईपासून तुम्ही छान जाड तूप बनवू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.