Dosa Making Tips : डोसा तव्याला चिकटणारच नाही; बनेल एकदम कुरकुरीत, फक्त या टिप्स फॉलो करा

Crispy Tava Dosa Tips : फक्त सर्वसामान्यानाच नाही तर अनेक सेलिब्रेटी सांभर व चटणी सोबत डोसा आवडीने खातात.
Dosa Making Tips
Dosa Making TipsSaam tv

Kitchen Hacks : साउथ इंडियनचे पदार्थ बऱ्यापैकी सगळ्यांच आवडतात. प्रत्येकाच्या घरी संडे स्पेशलला डोसा हा हमखास बनवला जातो. फक्त सर्वसामान्यानाच नाही तर अनेक सेलिब्रेटी सांभर व चटणी सोबत डोसा आवडीने खातात.

परंतु, अण्णासारखा डोसा प्रत्येकाचा बनत नाही. कधी बॅटरच चुकते तर कधी डोसाच तव्याला चिकटतो. यामुळे आपण घरी डोसा बनवण्याच्या फंद्यात पडत नाही. पण आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स (Tips) व ट्रिक्स सांगणार आहोत. ज्याचा वापर करुन तुम्ही अगदी अण्णासारखा कुरकुरीत स्टाइलचा डोसा घरच्या घरी (Home) बनवू शकता. जाणून घेऊया त्याबद्दल

Dosa Making Tips
Kairi Chutney Recipe: उन्हाळ्यात कशी बनवाल आंबट-गोड कैरीची चटणी ? पाहा रेसिपी

1. तव्यावर घाण नसावी

डोसा बनवायचा असेल तर सर्वप्रथम तव्याची नीट साफ करून घ्यावी. जर त्यावर तेल किंवा घाण असेल तर डोसा नीट बनत नाही. यासाठी तुम्ही तव्याची नीट साफ करावी.

2. कांदा किंवा बटाट्याच्या साहाय्याने तवा घासा

गुळगुळीत डोसा बनवण्यासाठी तवा अगोदरच तयार करून ठेवावा. यासाठी कांदा किंवा बटाटा अर्धा कापून घ्या. आता तुम्ही अर्धा चिरलेला कांदा किंवा बटाटा तेलात (Oil) बुडवून तव्याला ग्रीस करू शकता.

Dosa Making Tips
Amla Pickle Recipe : चटपटतील आवळ्याच्या लोणच्याची चव चाखलीये का ? पाहा रेसिपी

3. तवा गरम करुन नंतर थंड करा

जर तुमचा डोसा सतत चिकटत असेल तर, तवा एकदा चांगला गरम करा आणि नंतर थंड करा. आता या तव्यावर डोसा बनवल्यावर ते अधिक कुरकुरीत होईल.

4. या चुका करू नका

जर तुम्ही डोसा बनवणार असाल तर फ्रिजमधून बाहेर काढल्यानंतर लगेच त्याचा वापर करू नका. डोसा बनवण्यापूर्वी थोडा वेळ बॅटर काढून बाहेर ठेवा आणि सामान्य तापमानावर ठेवा. डोसा पीठ तयार करताना लक्षात ठेवा की त्यात जास्त पाणी घालू नये. पिठात जास्त पाणी असल्यास डोसा चिकटतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com