WhatsApp AI Stickers: व्हॉट्सॲपवर बनवा स्वतःचे एआय स्टिकर्स, 'ही' सोपी पद्धत वापरा

WhatsApp AI Stickers Tips: सध्या सोशल मीडियावर एआय स्टिकर्सचं प्रमाण वाढलं आहेत. तुम्हाला पण स्वतःचं एआय स्टिकर्स बनवायचं आहे का, तर त्यासाठी आज एक विशेष फीचर आपण जाणून घेऊ या.
AI Stickers
AI Stickers Google

How To Create WhatsApp AI Stickers

जगातील सर्वाधिक वापरलेले इन्स्टंट मेसेजिंग ॲप WhatsApp आहे. व्हॉट्सॲपमध्ये वापरकर्त्याचा अनुभव वाढवण्यासाठी अनेक मनोरंजक वैशिष्ट्ये आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान आल्यानंतर व्हॉट्सॲपमध्येही या तंत्रज्ञानाचा वापर केला जात (WhatsApp AI Stickers Tips) आहे. व्हॉट्सॲपमध्ये असे एक उत्तम AI फीचर आहे, ज्याच्या मदतीने आपण आपले स्वतःचे AI स्टिकर्स अगदी सहज तयार करू शकतो. (Latest Marathi News)

सध्या सोशल मीडियावर एआय स्टिकर्सचं प्रमाण वाढलं आहेत. व्हॉट्सॲप एआय स्टिकर्स तयार करून आपण हे स्टिकर्स मित्रांनाही शेअरही करू शकतो. स्वतःचं AI स्टिकर्स (AI Stickers Tips And Tricks) कसं तयार करायचं हे आपण जाणून घेऊ या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

AI स्टिकर्स कसं तयार करायचं

  • सर्वप्रथम, ज्या व्यक्तीला तुम्हाला AI स्टिकर पाठवायचे आहे. त्याच्या नावावर क्लिक करून चॅटबॉक्स उघडा.

  • यानंतर, चॅट बॉक्सच्या डाव्या बाजूला दिसणाऱ्या स्माइलीवर टॅप करा आणि स्टिकर पर्यायावर क्लिक करा.

  • स्टिकर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अवतार नवीन लिहिलेले दिसेल, या पर्यायावर टॅप करा.

  • तुम्ही या पर्यायावर टॅप करताच तुम्हाला स्क्रीनवर Loading Avatar लिहिलेले दिसेल.

AI Stickers
Indian Army: लष्कराच्या ताकदीला AI ची जोड, अत्याधुनिक रणगाड्यांसाठी आर्मी 57 हजार कोटी खर्च करणार

व्हॉट्सॲप AI स्टिकर तयार करण्याची प्रक्रिया

पुढील स्क्रीनवर Get Started दिसेल, या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला दोन पर्याय मिळतील, पहिला पर्याय म्हणजे व्हॉट्सॲपचे हे फीचर तुमच्या चित्रावर क्लिक करेल आणि तुमचा AI अवतार स्टिकरच्या रूपात तयार करेल. दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही मॅन्युअली देखील अवतार तयार करू शकता.

टेक फोटो पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक छान चित्र क्लिक होते. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्किन टोन निवडण्यास सांगितलं जातं. तुम्ही स्किन टोन निवडताच तुमचा AI अवतार तयार होईल. अवतार तयार केल्यानंतर, तुमचा अवतार स्टिकर विभागात दृश्यमान होतो, तो (AI Stickers) आपल्याला कुणासोबतही शेअर करता येतो.

AI Stickers
AI Read 2000 Year Old Text : AI चा अविष्कार! 2000 वर्षांपूर्वी जळून राख झालेला मजकूर वाचण्यात यश; प्राचिन संस्कृतींचं रहस्य उलगडणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com