Artificial Intelligence: चॅट जीपीटी आणि गुगल बार्ड वापरताय? वेळीच सतर्क व्हा, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान

ChatGPT and Google Bard: एआयच्या मदतीने अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाले आहेत. चॅट जीपीटी आणि गुगल बार्डचा वापर मोठ्या धोक्यांना निमंत्रण देत आहे. त्यामुळं वेळीच सावध होण्याची गरज आहे.
AI Causes
AI Causes Saam Tv
Published On

Cause OF AI Tools

चॅटजीपीटी आणि गुगल बार्डमुळे आपण परावलंबी होत आहोत. अनेकदा आपण आपले कामं स्वत: करण्याऐवजी एआय टूल्सद्वारे (AI Tools) पूर्ण करत आहेत. याचा थेट परिणाम वापरकर्त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर होत आहे. एआय टूल्स वापराचा विपरीत परिणाम काय आहे, ते आपण जाणून घेऊ या. (latest viral videos)

अलीकडे एआय टुल्सचं आपल्या जीवनातील प्राधान्य वाढत चाललं आहे. सध्या हा प्रभाव मर्यादित आहे, परंतु येत्या काही दिवसांत चॅट जीपीटी आणि गुगल बोर्डचा वापर असाच वाढत राहिला, तर मोठं नुकसान सहन करावं लागेल. या कारणास्तव आपण AI मुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती जाणून घेऊ या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डीपफेकची डोकेदुखी

बॉलीवूड अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या डीपफेक (deepfake) व्हिडिओनंतर, एआयच्या मदतीने अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाले आहेत. डीपफेक व्हिडिओंमध्ये, सायबर गुन्हेगार एखाद्या सेलिब्रिटीचा चेहरा वापरतात आणि ते दुसऱ्याच्या शरीरावर चिकटवतात. त्यामुळे त्या व्यक्तीचे मानसिक आणि आर्थिक नुकसान होते. एआयचा वापर असाच वाढत राहिला तर डीपफेक व्हिडिओंद्वारे ब्लॅकमेलिंगही सुरू होऊ शकते.

चुकीची माहिती पसरवण्याचा धोका

एआय (Artificial Intelligence) चॅटबॉट्स एखाद्या विषयाबद्दल अगदी कमी वेळात तपशीलवार माहिती देतो. या कामात AI चा वेग मानवापेक्षा जास्त आहे. जगभरातील फेक न्यूज आणि चुकीची माहिती यांसारख्या प्रकरणांमध्ये AI चे हे वैशिष्ट्य धोकादायक ठरू शकते. हॅकर्स याचा फायदा घेऊन चुकीची माहिती पसरवू शकतात. त्याचा सर्वात वाईट परिणाम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होणार आहे. याशिवाय, काही AI प्लॅटफॉर्म फोटो आणि व्हिडिओ देखील जनरेट करू शकतात. खोट्या बातम्या पसरवण्यासाठी ह्यांचा वापर केला जाऊ शकतो.

बेरोजगारीमध्ये वाढ होईल

एआयमुळे निर्माण होणारी मोठी समस्या बेरोजगारीची आहे. स्मार्ट कामासाठी एआयचा वापर अनेक कंपन्यांमध्ये सुरू झाला (AI Loss) आहे. परिणामी, कंपन्या मोठ्या प्रमाणावर टाळेबंदी करू शकतात. सध्या डेटा एन्ट्री, बुक-कीपर, ट्रान्सलेटर, कस्टमर केअर, कॉपीरायटिंग आणि सोशल मीडिया मॅनेजर यांच्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका आहे. एका अहवालानुसार, AI सुमारे 300 दशलक्ष लोकांच्या नोकऱ्या बळकावू शकते.

सुरक्षिततेची भीती

2020 च्या अहवालात सायबर सुरक्षेसाठी AI ची मदत घेण्याबाबत बोललं गेलं होते. त्यात म्हटलंय की, कृत्रिम बुद्धिमत्ता मानवांपेक्षा मोठ्या धोक्यांचा शोध घेऊ शकते. त्यानुसार, AI मानवांच्या सुरक्षिततेची माहिती (ChatGPT and Google Bard) घेईल. धोक्यांवर नियंत्रण ठेवण्याचे मार्ग देखील शोधेल. एआयवर अवलंबून राहणं देखील मोठी समस्या निर्माण करू शकते. सुरक्षेच्या भीतीमुळे इटलीने ChatGPT वर बंदी घातली आहे. यानंतर आता जर्मनी AI चॅटबॉट्सवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com