AI Read 2000 Year Old Text : AI चा अविष्कार! 2000 वर्षांपूर्वी जळून राख झालेला मजकूर वाचण्यात यश; प्राचिन संस्कृतींचं रहस्य उलगडणार?

AI Read 2000 Year Old Text : AI च्या मदतीने सुमारे 2,000 वर्षांपूर्वी मातीत गाडलेली आणि ज्वालामुखीत जळून राख झालेली प्राचीन लिपी आणि लेखन समजून घेण्यात मदत झाली आहे.
AI Read 2000 Year Old Text
AI Read 2000 Year Old TextSaam Digital
Published On

AI Read 2000 Year Old Text

या जगात आपण कितीही पुस्तके वाचली, वाचन-लेखनासाठी कितीही व्यासपीठं असली, तरी वैज्ञानिक प्रगतीनंतरही वाचता येत नाही असं बरंच काही आहे. अनेक प्राचीन लिपी, शिलालेख आणि विविध भिंत लेखनाचा अभ्यास करण्यात आपण यशस्वी झालो तर जगाकडे आणि प्राचीन संस्कृतींकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून जाईल. दरम्यान सध्या चर्चेत असलेले आणि संपूर्ण माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला हादरवून टाकणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयची यात मोठी मदत होऊ शकते. शास्त्रज्ञांनीही दावा केला आहे की AI च्या मदतीने सुमारे 2,000 वर्षांपूर्वी मातीत गाडलेली आणि ज्वालामुखीत जळून राख झालेली प्राचीन लिपी आणि लेखन समजून घेण्यात मदत झाली आहे.

2,000 वर्षांपूर्वीच्या रोमन साम्राज्यातील या प्राचीन लिपी आहेत. कॅम्पानिया, इटलीतील हर्क्युलेनियम नावाचं शहर रोमन साम्राज्याचा भाग होते. 79 मध्ये व्हेसुव्हियस पर्वतावर ज्वालामुखीच्या उद्रेक झाला. या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हर्क्युलेनियम शहर पूर्णपणे जळून राख झाले. शहरातच एका बंगल्यात लायब्ररीही होती. ज्यामध्ये शेकडो पॅपिर स्क्रोल ठेवण्यात आले होते. पॅपिरस हा जाड कागद होता जो लेखनासाठी वापरला जात असे. हे पॅपिरस नावाच्या वनस्पतीच्या लगद्यापासून बनवले गेले. या ज्वालामुखीत संपूर्ण शहरासह हे पॅपिरसही जळून खाक झाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या भागात 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात उत्खनन सुरू झाले. हवेलीतून 1,000 पेक्षा जास्त गुंडाळलेले पॅपिरस बाहेर काढण्यात आले. असे मानले जाते की हे ज्युलियस सीझरच्या सासऱ्यांनी लिहिले होते. उत्खननानंतरचे सर्वात मोठे आव्हान ते म्हणजे स्क्रोलवर लिहिलेला मजकूर वाचणे. कारण ते सर्व कार्बनयुक्त होते, म्हणजेच ते जळून राख झाले होते. इतकेच नाही तर संशोधकांनी पॅपिरस त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचे तुकडे झाले.

AI Read 2000 Year Old Text
Tamil Nadu News: मोठी दुर्घटना! फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ८ कामगारांचा मृत्यू, ६ जखमी

AI चा वापर करून स्क्रिप्टचा उलगडा कसा झाला?

शास्त्रज्ञांनी हे आव्हान स्वीकारलं आणि त्याचा अभ्यास करण्याचं ठरवलं. अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ ब्रेंट सील्स याचं नेतृत्व करत होते. स्क्रोलवर असलेल्या मजकूराचा शोध लावण्यासाठी त्यांच्या टीमने एक स्पर्धा सुरू केली. व्हेसुव्हियस चॅलेंज असे नाव आहे. या अंतर्गत हाय-रिझोल्युशन सीटी स्कॅन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने स्क्रोल समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या स्पर्धेत अनेकांनी सहभाग घेतला.अनेक वर्षांनी पत्र वाचण्यात मला यश आले. हा शब्द "πορφυρας" किंवा "porphyras" होता, ज्याचा ग्रीकमध्ये जांभळा असा अनुवाद होतो.

यूएस-आधारित कार्यकारी नेट फ्रीडमन यांनी सांगितलं की तीन विद्यार्थ्यांनी 2,000 हून अधिक अक्षरे उलगडली आहेत. जर्मनीचा जोसेफ नाडर, अमेरिकेचा ल्यूक फॅरिटर आणि स्वित्झर्लंडचा ज्युलियन शिलिगर. ही एक ऐतिहासिक घटना असून त्याचं कौतुकही होत आहे. यातून रोमन साम्राज्याचा इतिहास समजण्यास आणखी मदत तर होईलच, शिवाय प्राचीन संस्कृती आणि भाषांचा अभ्यास करणे अधिक सोपं होणार आहे.

AI Read 2000 Year Old Text
Delhi Confidence Motion: आपकडे 62 आमदार, विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी केवळ 54 का होते उपस्थित? केजरीवाल यांनी सांगितलं कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com