प्रत्येकाच्या घरामध्ये खुर्च्या असतात. अनेकांकडे प्लास्टिकची तर काहीजणांकडे लाकडी, लोखंडाची खुर्ची असते. तुमच्याही घरांमध्ये प्लास्टिकच्या खुर्च्या वापरत असतील तर तुमच्या लक्षात येईल की प्लास्टिकच्या खुर्च्या लवकर मळतात. प्लास्टिकच्या खुर्चीवर धूळ जमा होते त्यामुळे त्या पांढऱ्या ऐवजी काळसर दिसतात. तुम्हालाही खुर्च्या स्वच्छ करायच्या असतील तर कोणतेही केमिकल रसायने वापरण्याऐवजी तुम्ही स्वयंपाकघरातील काही साध्या वस्तूंचा वापर करा. खुर्च्या अगदी नवीन आणल्यासारख्या चमकवू शकता.
घरातील रोजच्या वापरायच्या खुर्च्या काही दिवसांनी पिवळ्यास काळसर दिसतात. सूर्यप्रकाश, धूळ आणि घाण यामुळे खुर्चा लवकर खराब होतात. खुर्च्यावरील हट्टी डाग लवकर निघत परंतु घरातील वस्तूंनी साफ केल्यास चमक परत येऊ शकते.
जर खुर्चीवर हट्टी डाग असतील तर बेकिंग सोडा वापरा. एका भांड्यामध्ये पाणी घ्या त्यात बेकिंग सोडा मिक्स करा. खुर्ची जेथे खराब झाली आहे तेथे ओल्या कापडाने पुसून काढा अथवा घासा. साधारण १० ते १५ मिनिटे तसेच ठेवा नंतर हलक्या हाताने स्वच्छ पाण्याने धुवून घ्या
खुर्चीवर पिवळे डाग असतील तर लिंबू आणि मिठाचा वापर करून पाहा. अर्ध्या लिंबूवर थोडे मिळ लावून ते खुर्चीवर जेथे पिवळा डाग आहे तेथे लावा. साधारण १० ते १५ मिनिटे तसेच राहू द्या नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
खुर्ची धुळीने खराब झाली असेल तर डिटर्जंट आणि कोमट पाण्याने स्वच्छ करा. एका बादलीमध्ये कोमट पाण्यात डिटर्जंट मिक्स करा आणि मऊ कापड बुडवून खुर्चीवर घासा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. खुर्ची सुकवण्यासाठी उन्हांमध्ये ठेवू नका.
खुर्ची स्वच्छ करण्यासाठी कडक तारेचा ब्रश वापरणे टाळा कारण यामुळे प्लास्टिकच्या खुर्चीवर बारीक ओरखडे येऊ शकतात ज्यावर नंतर धूळ आणि घाण अधिक सहजपणे जमा होते. स्वच्छतेसाठी मऊ स्पंज, कापड किंवा मऊ ब्रश वापरा. त्याचप्रमाणे, केमिकल रसायने किंवा ब्लीचचा वारंवार वापर करणे टाळा.