Manasvi Choudhary
जर तुम्हाला डायबिटीज असेल तर आहारात योग्य ती काळजी घेणे महत्वाचे आहे. डायबिटीजचे रूग्ण नारळपाणी पिऊ शकतात का? असा प्रश्न असेल तर काय करावे?
डायबिटीजचे रूग्ण नारळपाणी पिऊ शकतात. परंतु योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी नारळ पाणी पिणे महत्वाचे आहे.
ताजे नारळपाणी प्यावे कारण पॅकेज्डबंद नारळपाण्यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असू शकते.
सुरूवातीला नारळपाणी पिताना कमी प्रमाणात प्यावे. नारळपाण्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण असते.
नाश्ता किंवा जेवण केल्यानंतर नारळ पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी मंदावते. त्यामुळे साखरेवर परिणाम होत नाही. तुमच्या आरोग्यानुसार वैद्यकीय सल्ला घेऊन नारळपाण्याचे सेवन करणे महत्वाचे आहे.
नारळ पाण्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण असते त्यामुळे जर तुम्हाला किडनीचा आजार असेल आणि तुम्ही औषधे घेत असाल तर नारळ पाणी पिणे शक्यतो टाळावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.