सकाळ, दुपार की संध्याकाळी? तुम्ही चुकीच्या वेळी चहा पित नाही ना, शरीरावर काय होतात परिणाम?

Manasvi Choudhary

चहा पिण्याची सवय

भारतात चहा पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेकांच्या दिवसाची सुरूवात गरमा गरम चहा प्यायल्याने होते. चहा प्यायल्याने शरीरातील थकवा कमी होतो आणि मूड फ्रेश राहण्यास मदत होते.

tea | pinterest

आरोग्यावर होतो परिणाम

परंतु, चहा योग्य वेळी पिणे देखील आरोग्यासाठी महत्वाचे आहे. तुम्ही जर चुकीच्या वेळी चहा पित असाल तर ती सवय बदलणे महत्वाचे आहे.

tea | pinterest

रिकाम्यापोटी चहा प्यावा की नाही?

अनेकांना सकाळी रिकाम्यापोटी चहा पिण्याची सवय असते. चहामध्ये कफिन असते त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने आरोग्यावर परिणाम होतो.

Tea

आरोग्याच्या समस्या निर्माण

काहीही न खाता रिकाम्यापोटी चहाचे सेवन केले तर छातीत जळजळ, गॅस, असिडिटी या समस्या निर्माण होतात.

tea | pinterest

सकाळी रिकाम्यापोटी चहा प्यावा की नाही?

सकाळी रिकाम्यापोटी चहा पिण्याऐवजी तुम्ही हलकासा नाश्ता केल्यानंतप चहा पिणे आरोग्यासाठी योग्य मानले जाते. चहाचे सेवन करताना ते योग्य प्रमाणात करणे देखील महत्वाचे आहे.

tea

झोपण्यापूर्वी चहा पिणे टाळा

जर, चहा किंवा कॉफीमुळे झोपेवर परिणाम होत असेल तर संध्याकाळी आणि रात्री कॅफीनयुक्त चहा घेणे टाळावे.

tea | pinterest

जास्त गरम चहा पिणे टाळा

अत्यंत गरम चहा आरोग्यासाठी योग्य नाही. गरमा गरम चहा प्यायल्याने अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो त्यामुळे चहा मध्यम तापमानापर्यंत थंड झाल्यावर पिणे योग्य असेल.

Tea

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Best Wallet Colors for Financial Growth: पैशात वाढ होण्यासाठी कोणत्या रंगाचे पाकीट व पर्स वापरावी?

Best Wallet Colors for Financial Growth
येथे क्लिक करा....