Manasvi Choudhary
घर स्वच्छ आणि टापटीप ठेवण्यासाठी दररोज झाडू मारतो आणि फरशी पुसतो.
परंतु अनेकदा झाडू मारून झाल्यावर काही वेळातच फरशीवर धूळ जमा होते. त्यामुळे पुन्हा पुन्हा झाडू मारावा लागतो.
अनेकदा आपल्याला असं वाटते की ही बाहेरील रस्त्यावरून आलेली धूळ आहे; पण नेहमीच तसे नसते. झाडू मारण्याची आणि धूळ साफ करण्याची चुकीची पद्धत देखील घरातील धूळीचे कारण असू शकते.
साफसफाई करताना नेहमी उंचावरील वस्तूपासून सुरुवात करा नंतर फरशी झाडा. जर तुम्ही आधी फरशीवर झाडू मारला आणि त्यानंतर सिलिंग फॅन, टेबलवरची धूळ झटकली, तर ती सर्व धूळ पुन्हा फरशीवरच जमी होईल.
उंचावरील धूळ झाडून ती फरशीवर जमा होऊ द्यावी आणि सर्वात शेवटी फरशीवर झाडू मारा.
कोरड्या कपड्याने किंवा झाडूने धूळ झटकल्यास धुळीचे सूक्ष्म कण हवेत उडतात आणि थोड्या वेळाने ते पुन्हा त्याच जागेवर किंवा फरशीवर येऊन बसतात. यासाठी धूळ काढण्यासाठी हलका ओला कपडा वापरावा.