Healthy Aging Test: वाढत्या वयानुसार तुम्ही किती फीट आहात? ३० सेकंदांची टेस्ट सांगणार तुमचा फीटनेस

Muscle weakness symptoms: फक्त ३० सेकंदांची सिट-टू-स्टँड टेस्ट तुमच्या शरीराची ताकद, स्नायूंची क्षमता आणि वाढत्या वयानुसार आरोग्याचा धोका ओळखण्यास मदत करू शकते. तज्ज्ञांच्या मते, ही टेस्ट पडण्याचा आणि गंभीर आजारांचा धोका दर्शवू शकते.
Healthy Aging Test: वाढत्या वयानुसार तुम्ही किती फीट आहात? ३० सेकंदांची टेस्ट सांगणार तुमचा फीटनेस
Published On

फक्त ३० सेकंदांची सिट-टू-स्टँड टेस्ट तुमच्या शरीराची ताकद, स्नायूंची क्षमता आणि वाढत्या वयानुसार आरोग्याचा धोका ओळखण्यास मदत करू शकते. तज्ज्ञांच्या मते, ही टेस्ट पडण्याचा आणि गंभीर आजारांचा धोका दर्शवू शकते.

वय वाढणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु वाढत्या वयानुसार तुमचं शरीर किती मजबूत आणि एक्टिव्ह राहतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. अनेक लोकांची दीर्घकाळ निरोगी जीवन जगण्याची इ्च्छा असते. मात्र परंतु हळूहळू येणारा स्नायूंचा कमकुतपणा एक मोठा धोका निर्माण करू शकतो.

Healthy Aging Test: वाढत्या वयानुसार तुम्ही किती फीट आहात? ३० सेकंदांची टेस्ट सांगणार तुमचा फीटनेस
Tumor warning signs: शरीरात ही ७ लक्षणं दिसली तर समजा कॅन्सरचा ट्यूमर होतोय तयार

आता, शास्त्रज्ञांनी एक सोपी पद्धत उघड केलीये. जी तुम्हाला तुमच्या घरात आरामात बसून फक्त ३० सेकंदात तुमच्या शरीराची ताकद आणि वय वाढल्यानंतरचे परिणाम तपासण्यास मदत करू शकणार आहे.

'जर्नल ऑफ स्पोर्ट अँड हेल्थ सायन्स'मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, ३०-सेकंदांची सिट-टू-स्टँड टेस्ट एखाद्या व्यक्तीच्या पडण्याचा, रुग्णालयात दाखल होण्याचा किंवा अकाली मृत्यूचा धोका वर्तवू शकते. तज्ञांच्या मते, ही चाचणी स्नायूंची ताकद आणि शारीरिक कार्याची माहिती घेण्यासाठी एक उत्तम पर्याय मानली जाते.

Healthy Aging Test: वाढत्या वयानुसार तुम्ही किती फीट आहात? ३० सेकंदांची टेस्ट सांगणार तुमचा फीटनेस
Diabetes Symptoms: अचानक हे ५ बदल दिसले तर समजा शरीरात साखरेचं प्रमाण वाढलंय, वेळीच लक्षणं ओळखा

वाढत्या वयानुसार स्नायू का कमकुवत होतात?

तज्ज्ञांच्या मते, वाढत्या वयाचा सर्वात मोठा परिणाम शरीरातील स्नायू आणि हाडांवर होतो. ही प्रक्रिया वयाच्या ३० वर्षांनंतर हळूहळू सुरू होते आणि ६० वर्षांनंतर तिचा वेग वाढतो. संशोधकांच्या मते, वाढत्या वयानुसार शरीरातील 'फास्ट-ट्विच' मसल फायबर म्हणजेय वेगाने काम करणारे स्नायू कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे चेतासंस्था पूर्वीप्रमाणे स्नायूंना एक्टिव्ह करू शकत नाही. स्नायूंमध्ये चरबी आणि इतर पेशी जमा होऊ लागतात, ज्यामुळे शरीराच्या ताकदीवर आणि हालचालींवर परिणाम होतो.

काय आहे ३० सेकंदांची सिट-टू-स्टँड टेस्ट?

सिट-टू-स्टँड टेस्ट खूप सोपी मानली जाते आणि ती घरी करता येते. यासाठी एका खुर्चीची आवश्यकता असतं. ही टेस्ट करण्यासाठी व्यक्तीने खुर्चीत बसावं आणि आपले हात छातीवर दुमडून ३० सेकंदांच्या आत शक्य तितक्या वेळा उभं राहावं. त्यानंतर वय, वजन, उंची आणि एकूण गोष्टींच्या आधारावर स्नायूंच्या ताकदीची माहिती मिळते.

Healthy Aging Test: वाढत्या वयानुसार तुम्ही किती फीट आहात? ३० सेकंदांची टेस्ट सांगणार तुमचा फीटनेस
Blood Clot: शरीरात 'ही' 7 लक्षणं दिसली तर समजा मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यात

या अभ्यासात ६५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या १,८७६ लोकांच्या माहितीचा अभ्यास करण्यात आला. संशोधकांना असं आढळलं की, ज्यांची शारीरिक ताकद कमी होती, त्यांना अनेक आरोग्य समस्यांचा धोका जास्त होता.

Healthy Aging Test: वाढत्या वयानुसार तुम्ही किती फीट आहात? ३० सेकंदांची टेस्ट सांगणार तुमचा फीटनेस
Brain stroke symptoms: अचानक जर ही ५ लक्षणं दिसली तर समजा ब्रेन स्ट्रोकचा आहे धोका

पुरुषांमध्ये, ज्यांची स्नायूंची ताकद कमी होती त्यांना पडण्याचा आणि हाडं मोडण्याचा धोका जास्त होता. महिलांना कंबर मोडण्याचा आणि पडण्याचा धोका जास्त होता. अभ्यासानुसार, कमजोर स्नायू असलेल्या महिलांना रुग्णालयात दाखल होण्याचा आणि जास्त वेळा रुग्णालयात राहण्याचा धोका २९ टक्क्यांनी जास्त होता. तसंच हा त्रास असलेल्या पुरुषांमध्ये मृत्यूचा धोका ५७ टक्क्यांनी जास्त असतो. महिलांमध्ये हा धोका दुप्पटीहून अधिक होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com