Brain stroke symptoms: अचानक जर ही ५ लक्षणं दिसली तर समजा ब्रेन स्ट्रोकचा आहे धोका

Surabhi Jayashree Jagdish

स्ट्रोक

कोणत्याही समस्येची लक्षणं शरीर तुम्हाला देत असतं. शरीराकडून मिळणाऱ्या छोट्या-छोट्या इशाऱ्यांकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. मात्र डॉक्टरांच्या मते, स्ट्रोकसारखा गंभीर आजार अनेकदा अगदी सामान्य वाटणाऱ्या लक्षणांमधून सुरुवातीला संकेत देत असतो. ही लक्षणं काय आहेत ती पाहूयात.

Silent stroke signs

एका बाजूला अचानक कमजोरी जाणवणं

स्ट्रोकचं सर्वात सामान्य लक्षण म्हणजे चेहरा, हात किंवा पायाच्या एका बाजूला अचानक जडपणा, कमजोरी किंवा मुंग्या येणं. पण शरीराच्या एका बाजूवर परिणाम होणं हे मेंदूकडे जाणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्याचं संकेत असू शकतं.

Brain stroke warning

बोलण्यात अडचण येणं

अचानक बोलताना शब्द स्पष्ट न उच्चारणं, बोलणं वेगळं वाटणं किंवा साध्या गोष्टी समजण्यात अडचण येणं हीदेखील स्ट्रोकची सुरुवातीची चिन्हं असू शकतात. मेंदूतील भाषेशी संबंधित भागावर परिणाम झाल्यास अशी समस्या निर्माण होऊ शकते.

Stroke causes

तीव्र डोकेदुखी होणं

काही वेळा अचानक खूप तीव्र डोकेदुखी सुरू होते. अशी तीव्र वेदना मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याचं लक्षण असू शकतं. विशेषतः उलटी, चक्कर येणं किंवा दृष्टी कमी होणं यांसारखी लक्षणंही त्यासोबत दिसत असतील तर ही परिस्थिती गंभीर असू शकते.

Sudden weakness signs

चालताना तोल जाणं

अचानक चालताना तोल जाणं, चक्कर येणं किंवा शरीरावर नियंत्रण नसल्यासारखं वाटणं ही लक्षणंही धोक्याची घंटा ठरू शकतात. मेंदूतील संतुलन नियंत्रित करणाऱ्या भागावर परिणाम झाल्यास अशी समस्या उद्भवू शकते.

Brain health tips

दृष्टीवर परिणाम होणं

एका किंवा दोन्ही डोळ्यांनी अस्पष्ट दिसणं, दुहेरी दिसणं किंवा अचानक दृष्टी जाणं हीदेखील स्ट्रोकची लक्षणं असू शकतात. अनेकजण हे स्क्रीनसमोर जास्त वेळ बसल्यामुळे किंवा डोळ्यांचा थकवा समजतात. पण मेंदूतील दृष्टी नियंत्रित करणाऱ्या भागात रक्तपुरवठा कमी झाल्यास अशी समस्या निर्माण होऊ शकते.

Blurred vision stroke

वेळीच घ्या डॉक्टरांची मदत

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, स्ट्रोकची लक्षणं ओळखून वेळेत उपचार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणतीही लक्षणं अचानक दिसू लागल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय मदत घेणं गरजेचं आहे.

Severe headache causes

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

hypertension at night
येथे क्लिक करा