Monsoon health: पावसाळ्यात घरातील ओलावा आणि बुरशी तुमच्या फुफ्फुसांसाठी किती घातक ठरू शकते? डॉक्टरांनी केला मोठा इशारा

पावसाळ्यात दमा आणि सीओपीडी रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी? बुरशी, ओलावा, संसर्ग आणि तापमानातील बदलांपासून फुफ्फुसांचं संरक्षण करण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या. नियमित इन्हेलर, मास्क आणि योग्य जीवनशैलीचं महत्त्व समजून घ्या.
Monsoon health
Monsoon healthsaam tv
Published On

पावसाळ्यात वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळाला तरी दमा आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज असलेल्या रुग्णांसाठी हा काळ अधिक सावधगिरीचा बाळगण्याचा आहे. पावसाळ्यात वाढलेली हवेतील आर्द्रता, घरांमध्ये निर्माण होणारा ओलावा, बुरशीची वाढ, विषाणूजन्य संसर्ग तसंच तापमानात अचानक होणारे बदल यामुळे श्वसनमार्गांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

परिणामी, दम्याचं त्रास वाढणे किंवा सीओपीडीची लक्षणं आणखी तीव्र होण्याचा धोका वाढतो या रुग्णांनी पावसाळ्यात फुफ्फुसांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

झायनोवा शाल्बी हॉस्पिटलमधील फुफ्फुस विकार तज्ज्ञ डॉ. जय भानुशाली यांनी सांगितलं की, दम्यामध्ये श्वसनमार्गाला सूज येऊन ते अरुंद होतात. त्यामुळे छातीत घरघर, सतत खोकला, छातीत जडपणा आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणं दिसून येतात. सीओपीडी हा दीर्घकालीन फुफ्फुसांचा आजार असून धूम्रपान किंवा दीर्घकाळ वायुप्रदूषणामुळे देखील होऊ शकतो. या आजारामध्ये सतत खोकला येणं, जास्त प्रमाणात कफ येणं, धाप लागणं आणि शारीरिक क्षमता कमी होणं अशी लक्षणं जाणवतात.

Monsoon health
Oral cancer treatment: ओरल कॅन्सरवर अल्ट्रासाउंड उपचार शक्य? नवीन संशोधनातून आशादायक निष्कर्ष

पावसाळ्यात का वाढतो दम्याचा त्रास?

पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यामुळे घरामध्ये बुरशी, फंगस आणि धूलिकण (डस्ट माइट्स) वाढण्यास पोषक वातावरण तयार होतं. हे सर्व दम्यास कारणीभूत ठरू शकतं. याच काळात विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य संसर्गाचे प्रमाणही वाढतं. त्यामुळे सीओपीडीच्या रुग्णांमध्ये फुफ्फुसांचा संसर्ग होऊन आजार अधिक बळावू शकतो.

तापमानात अचानक झालेले बदल, थंड हवेशी येणारा संपर्क आणि घरात हवा खेळती न राहणं यामुळे श्वसनमार्गास त्रास होऊ शकतो. दमा किंवा सीओपीडी योग्य प्रकारे नियंत्रणात न ठेवल्यास वारंवार अस्थमा अटॅक येणं, श्वासोच्छ्वासास त्रास होणं, न्यूमोनियाचा धोका, फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होणं तसंच वारंवार रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येऊ शकते.

Monsoon health
High Blood Pressure: अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास शरीरामध्ये दिसतील ही ६ मोठी लक्षणं

कशी घ्याल स्वतःची काळजी?

  • दमा आणि सीओपीडीच्या रुग्णांनी डॉक्टरांनी सांगितलेला इन्हेलर आणि औषधांचा नियमित वापर करावा.

  • घरात ओलावा आणि बुरशी राहणार नाही याची काळजी घ्यावी. भिंतींवरील बुरशी वेळीच स्वच्छ करावी. धूम्रपान तसेच वायुप्रदूषणापासून दूर राहावं.

  • गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणं, वारंवार हात स्वच्छ धुणं, आजारी व्यक्तींपासून सुरक्षित अंतर राखणं तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इन्फ्लूएंझा आणि न्यूमोनियावरील लस घेणं फायदेशीर ठरतं.

याशिवाय संतुलित आहाराचं सेवन करणं, पुरेसे पाणी पिणं, नियमित श्वसनाचे व्यायाम करणं, शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणं आणि पुरेशी झोप घेणं यामुळे फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.

Monsoon health
High Blood Pressure: लिंबू पाण्यामुळे खरंच रक्तदाब कमी होतो का? वायरल दाव्यावर डॉक्टरांनी सांगितलं सत्य

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com