Surabhi Jayashree Jagdish
उच्च रक्तदाबाचा सुरुवातीला अनेकदा कोणतीही ठळक लक्षणं दाखवत नाही, म्हणून त्याला 'सायलेंट किलर' असंही म्हटलं जातं. तरीही शरीर काही सूक्ष्म संकेत घरच्या दैनंदिन कामांमध्ये देऊ लागतं. हे संकेत ओळखले नाहीत तर पुढे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
सकाळी उठल्यावर डोकं जड वाटणं किंवा मागच्या भागात दुखणं हे सुरुवातीचं लक्षण असू शकतं. हे लक्षण अनेकदा रात्री रक्तदाब वाढल्यामुळे दिसून येतं. काही लोकांना ही डोकेदुखी रोजच्या कामात अडथळा निर्माण करते. असं वारंवार घडत असेल तर रक्तदाब तपासणं गरजेचं आहे.
घरात साधं काम करताना किंवा थोडं चालल्यानंतरही खूप थकवा जाणवू शकतो. शरीराला पुरेसा ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा नीट न झाल्यामुळे अशी स्थिती निर्माण होते. हा थकवा सतत राहिला तर तो दुर्लक्षित करू नये.
जरा वेगाने चालल्यावर किंवा जिना चढताना श्वास लागणं हे देखील दिसू शकतं. हृदयावर वाढलेल्या दाबामुळे रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे शरीर लवकर थकून श्वास घेणं कठीण वाटतं.
घरकाम करताना एकाग्रता कमी होणं किंवा लहान गोष्टींवर चिडचिड होणं हे देखील दिसू शकतं. मेंदूपर्यंत रक्तप्रवाहात बदल झाल्यामुळे मानसिक थकवा जाणवतो. त्यामुळे निर्णय घेण्यात गोंधळ होऊ शकतो.
विश्रांती घेत असतानाही हृदय जोरात धडधडल्यासारखं वाटू शकतं. शरीराला जास्त रक्तदाबावर काम करावं लागत असल्यामुळे हा परिणाम दिसतो. कधी कधी छातीत हलकं दडपणही जाणवू शकतं.
काही लोकांना अचानक नाकातून रक्त येण्यासारखी समस्या जाणवू शकते. रक्तवाहिन्यांवर अचानक वाढलेला दाब यामागे कारण असतो. चेहऱ्यावर जडपणा किंवा ताण जाणवू शकतो.