Home Remedies for Dry Hair : केस कोरडे आणि रुक्ष झाले आहेत? १० रुपयात करा सिल्की-शाइनी

Dry Hair Symptoms : जर तुमचेही केस कोरडे आणि रुक्ष झाले असतील तर हे घरगुती उपाय करुन पाहाच
Home Remedies for Dry Hair
Home Remedies for Dry HairSaam Tv

Dry Hair Care :

केसगळतीची समस्या, केस कोरडे होणे किंवा केसांची वाढ खुंटणे यामुळे सध्या जगभरातील ९०टक्के लोक त्रस्त आहेत. केसांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य टिकून राहाते. केस विंचरताना बरेचदा केसांचा गुच्छा बाहेर निघतो त्यामुळे टक्कल पडण्याची भीती वाटू लागते.

कोरड्या आणि रुक्ष केसांमुळे आपल्याला त्याला सतत बांधून ठेवावे लागते. हल्ली केसांसाठी बाजारात अनेक शाम्पू आणि महागडे केमिकल उत्पादने आहेत ज्याचा फायदा जितका आहे तितकेच जास्त नुकसानही. जर तुमचेही केस कोरडे आणि रुक्ष झाले असतील तर हे घरगुती उपाय करुन पाहाच

Home Remedies for Dry Hair
Dandruff Problem In Hair : केसात कोंडा झालाय, सतत खाज सुटतेय? स्वयंपाकघरातील हे पदार्थ ठरतील गुणकारी

1. केळी

केळी (banana) ही केसांसाठी फायदेशीर मानली जाते. पिकलेल्या केळीमध्ये दोन चमचे मध आणि १/३ कप खोबरेल तेल घाला. अर्धातास केसांवर ठेवून नंतर धुवा, केसांचा कोरडेपणा कमी होईल.

2. मध

केसांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी एक किंवा अर्धा कप पाणी घ्या. त्यात एक चमचा मध (Honey) घाला. केसांना लावून अर्धा तास ठेवा. नंतर कोमट पाण्याने केस धुवा.

3. खोबरेल तेल

नारळाचे तेल केसांवर जादूचे सारखे काम करते. यामुळे केसांचा (Oil) रुक्षपणा कमी तर होतोच पण केसांना मॉइश्चरायझ देखील करते. यासाठी खोबऱ्याचे तेल गरम करुन थंड करा आणि केसांना लावा. किमान अर्धा तास ठेवा नंतर शॅम्पूने केस धुवा. असे आठवड्यातून २ ते ३ वेळा केल्यास फायदा होईल.

Home Remedies for Dry Hair
Best Couple Spots In Pune: पुण्यातील बेस्ट रोमँटीक कपल्स स्पॉट, प्रेमीयुगुलांसाठी स्वर्गच जणू

4. दही आणि कोरफड

दह्यामध्ये असलेले प्रोटीन केसांसाठी खूप फायदेशीर आहे. तसेच कोरफड देखील रामबाण उपाय मानले जाते. यासाठी कोरफड आणि दही प्रत्येकी एक चमचा घेऊन ते चांगले मिसळून मास्क बनवा. या मास्कने टाळूला 5 मिनिटे मसाज करा नंतर शाम्पूने केस धुवा

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com