कोमल दामुद्रे
आजकाल प्रदूषणामुळे किंवा वेळेअभावी लोक केसांची योग्य काळजी घेऊ शकत नाहीत.
तसेच, केसांच्या उत्पादनांचा वापर वेगवेगळ्या प्रकारच्या केशरचनांसाठी केला जातो, ज्यामुळे कोंड्याची समस्या उद्भवते.
कोंड्याची समस्येकडे दुर्लक्ष केल्यास केसगळती सुरु होते. कोंडा टाळण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत, जे केल्याने तुम्हाला लगेच आराम मिळेल.
कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी लिंबाचा रस खूप फायदेशीर मानला जातो. खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून लावा.
केसांना दही लावल्याने कोंड्याच्या समस्येपासून आराम मिळतो. याशिवाय केसांचे पोषणही होते.
कडुलिंब आणि तुळशीच्या पानांचा वापर करूनही कोंड्याची समस्या दूर होऊ शकते.
कोंडा दूर करण्यासाठी मेथीचे दाणे खूप फायदेशीर मानले जातात. मेथी दाणे आरोग्यासोबत केसांसाठीही चांगले आहे.