Best Couple Spots In Pune: पुण्यातील बेस्ट रोमँटीक कपल्स स्पॉट, प्रेमीयुगुलांसाठी स्वर्गच जणू

कोमल दामुद्रे

पुणे शहर

पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते.

वाड्यांचे शहर

वाड्यांचे शहर असणाऱ्या पुण्यात आपल्या पार्टनरसोबत फिरण्याचा प्लान करत असाल तर या ठिकांणांना जरुर भेट द्या

सारसबाग

सारसबाग पुण्यातील सगळ्यात प्रसिद्ध आणि लोकप्रिय गार्डन. हे गार्डन कपल्ससाठी पिकनिट स्पॉट आहे.

एम्प्रेस गार्डन

प्रिन्स ऑफ वेल्स रोडवर चाळीस एकरवर एम्प्रेस गार्डन हे पुणे शहरातील सर्वांत मोठे उद्यान आहे. येथील रंगीबेरंगी फुले आणि प्रसन्न वातावरण कपल्ससाठी चांगली जागा म्हणून ओळखली जाते.

वेताळ टेकडी

वेताळ टेकडी हे पुणे शहराचे विहंगम दृश्य देणारे निसर्गरम्य ठिकाण आहे. अनेक जोडपी या ठिकाणी ट्रेकला येतात.

राजीव गांधी नॅशनल पार्क

राजीव गांधी नॅशनल पार्क हे वन्यजीव संशोधन केंद्र म्हणून ओळखले जाते. प्रेमी जोडप्यांसाठी वन डे ट्रिप म्हणून उत्तम पर्याय आहे.

कमला नेहरु पार्क

शनिवार वाड्याजवळ असणारे कमला नेहरू पार्क शहराच्या क्षितिजाचे सुंदर दृश्य देते. अनेक जोडपी या ठिकाणी पाहयला मिळतात.

ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट

पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरात २८ एकर जागेत ओशो आश्रम आहे. ओशो गार्डन हे सुंदर लँडस्केप आणि झेनसारखे आकर्षक दृश्य पाहायला मिळतं.

Next : केसात कोंडा झालाय, सतत खाज सुटतेय? स्वयंपाकघरातील हे पदार्थ ठरतील गुणकारी