Door Name Plate Tips : दारावर तुमच्या नावाची पाटी लावण्या अगोदर 'हे' वाचा, नाहीतर सुख समृद्धी पाठ फिरवेल

Vastu Tips : घराच्या समृद्धीसाठी दारावर लावलेली नावाची पाटी महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे नेमप्लेट लावताना वास्तूशास्त्राचे नियम पाळावे. यामुळे घरात सुखाची भरभराट होते.
Vastu Tips
Door Name Plate TipsSAAM TV
Published On

वास्तुशास्त्रानुसार घरात सुख आणि समृद्धी हवी असल्यास वास्तू नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि धनसंपत्ती वाढते. तसेच घरातील लोकांचे आरोग्य चांगले राहते. लव्ह लाईफ, करिअर, नातेसंबंध सुधारतात.

दारावर तुमच्या नावाची पाटी लावण्या अगोदर वास्तुशास्त्राच्या 'या' गोष्टी लक्षात ठेवा

नेमप्लेटचा आकार

वास्तुशास्त्रानुसार दारावर नेमप्लेट कधीही आयताकृती आकाराची लावावी. बहुतेक लोक फॅशनच्या नादात गोल, त्रिकोणी आकाराच्या नेमप्लेट दारावर लावतात. मात्र यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. तसेच प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला नेमप्लेट लावावी.

नेमप्लेटवर तुमची ओळख

दारावर लावलेली नेमप्लेट तुमची ओळख थोडक्यात मांडणारी असावी. नेमप्लेट जास्त मोठी नसावी. दोन ओळींमध्ये नेमप्लेटवर लिहावे. नेमप्लेट कधीही दरवाज्याच्या किंवा भिंतीच्या अर्ध्या उंचीवर लावावी.

नेमप्लेटचा रंग

दारावर नेमप्लेट लावताना त्याचा रंगही लक्षात घेणे गरजेचे आहे. नेमप्लेटचा रंग ज्या व्यक्तीच्या नावावर घर आहे त्याच्या राशीनुसार असावा. नेमप्लेटवर गणपतीचे प्रतीक बनवल्यास बाहेरील नकारात्मकता घरात येणार नाही. तुमचे घर सुख-समृद्धीने भरेल. तसेच दारावर पांढऱ्या, पिवळ्या आणि केशरी रंगाच्या नेमप्लेट लावणे शुभ मानलं जाते. दारावर प्लास्टिक आणि दगडापासून बनविलेली नेमप्लेट लावू नये. घराच्या भरभराटीसाठी तांबे,स्टील आणि पितळेच्या धातूची नेमप्लेट दारावर लावावी.

Vastu Tips
Vastu Tips : बिझनेस सुरु करण्यापूर्वी या वास्तू टिप्स लक्षात ठेवा, कामात मिळेल यश

नेमप्लेटची स्वच्छता

दारावर नेमप्लेट लावल्यानंतर त्याची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. नियमित नेमप्लेटची स्वच्छता करा. नेमप्लेटच्या मागे घाण साचणार नाही याची काळजी घ्यावी. नेमप्लेट तुटली किंवा त्याचे पॉलिश निघाले असेल तर ताबडतोब नेमप्लेट दुरुस्ती करून घ्यावी. तसेच नेमप्लेट लावल्यावर दारावर नेहमी दिवा लावा. कारण नेमप्लेट कधीच काळोखात ठेवू नये.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Vastu Tips
Dream Astrology: रात्री झोपेत वाईट स्वप्न का पडतात? काय आहे वास्तू नियम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com