Kidney Health: BP, मानसिक ताण आणि चुकीच्या सवयींमुळे किडनीवर गंभीर परिणाम; डॉक्टरांनी दिलेली 'ही' माहिती नक्की वाचा

Blood Pressure: उच्च रक्तदाब, ताण, कमी झोप आणि जंक फूड खाण्याच्या सवयींमुळे तुम्ही किडनीचं नुकसान करत आहात. डॉक्टरांनी किडनी निरोगी ठेवण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत.
Kidney Health
Kidney Healthgoogle
Published On

सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. बऱ्याच जणांना या दिवसांत अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. याच दिवसांमध्ये लो ब्लड प्रेशर, ताण आणि किडनीच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. कारण सध्याची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलली आहे. लोक दिवसरात्र मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेले असतात. खाण्यापिण्याकडे त्यांचं लक्ष नसतं. तर जंक फूडचा समावेश त्यामध्ये केला जातोय.

Kidney Health
PM Kisan Yojana: मे महिना संपला तरी 23 वा हप्ता नाही; शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2000 कधी येणार? तारीख कधी येणार समोर?

तज्ज्ञांच्या मते, किडनी आपल्या शरीरातली घाण बाहेर काढते, रक्तदाब नियंत्रणात ठेवते आणि शरीरातल्या पाण्याच्या मदतीने बॅलेन्स ठेवण्याचं काम करते. पण आजकाल लोक किडनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि समस्या गंभीर झाल्यावरच त्याची जाणीव होते.

महत्वाचं म्हणजे ब्लड प्रेशर हे किडनी निकामी करू शकतं. किडनीत असलेल्या सूक्ष्म रक्तवाहिन्या रक्त शुद्ध करण्याचं काम करतात. रक्तदाब सतत वाढलेला राहिल्यावर या रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं आणि किडनीची कार्यक्षमता हळूहळू कमी व्हायला लागते. म्हणून याला सायलेंट किलरसुद्धा म्हंटलं जातं.

तुम्ही जितकी चिडचिड करता तितकं तुमच्या किडनीसाठी घातक असतं. जेव्हा तणाव वाढतो, तेव्हा शरीरात कॉर्टिसॉल आणि अॅड्रेनालिनसारख्या हार्मोन्सचं प्रमाण वाढतं. त्यामुळे रक्तदाब आणि रक्तातील साखर वाढण्याचा धोका निर्माण होतो.

उदाहरणार्थ, ऑफिसमधल्या कामाचा ताण, पैशांचं टेन्शन किंवा झोपेची कमतरता यामुळे काहींना तणावाखाली राहावं लागतं. अशावेळी जंक फूड खाणं, धूम्रपान करणं किंवा व्यायाम टाळणं या सवयी लागतात, ज्याचा थेट परिणाम किडनीवर होतो.

किडनी निरोगी ठेवण्यासाठी काय कराल?

रक्तदाब आणि रक्तातील साखर रोज तपासा.

दररोज किमान 30 मिनिटं चाला किंवा व्यायाम करा.

मीठ आणि जंक फूडचं खाणं टाळा.

पुरेसं पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा.

तणाव कमी करण्यासाठी योग, ध्यान किंवा प्राणायाम करा.

मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असेल तर रोज तपासणी करा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


Kidney Health
LIC Top 5 Schemes: दररोज फक्त ₹45 वाचवा आणि मिळवा ₹25 लाखांचा फंड! LIC च्या या 5 पॉलिसी करतायत कमाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com