High Blood Pressure: लाइफस्टाइलमधील हा १ बदल तुमचा ब्लड प्रेशर ठेवेल नियंत्रणात, वाचा डॉक्टरांचा महत्वाचा सल्ला

Hypertension Risk: हाय ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी आहार, व्यायाम, ध्यान आणि कमी मीठ घेणे अत्यंत गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार जीवनशैली बदलल्यास हृदय निरोगी राहते आणि BP नियंत्रणात राहतो.
BP control naturally
high blood pressure tipsgoogle
Published On

बदलत्या लाइफस्टाइलमुळे आता प्रत्येक घरातल्या एकातरी व्यक्तीला ब्लड प्रेशरचा त्रास असतो. हा आजार खूप शांतपणे शरीरात वाढत जातो. याची लक्षणंही खूप सामान्य असतात. त्यामुळे याचा तुमच्या ह्रदयावर कधी परिणाम होतो, हे कळतंच नाही. मग यावर उपचार सुरु केले जातात. पण फक्त डॉक्टरांनी दिलेली औषधं पुरेशी नसतात. तुम्हाला यासाठी इतर सवयींमध्येही काही महत्वाचे बदल करावे लागतात. पुढे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार तुम्ही काही बदल करुन तुमचे BP रेडींग सुधारु शकता आणि हेल्दी लाइफस्टाइल जगू शकता.

तज्ज्ञांच्या मते, सामान्य ब्लड प्रेशर हे 120/80 असायला हवे. पण 130 हा आकडा असेल तर प्री- हायपरटेन्शन मानलं जातं. जेव्हा BP 120/80 पेक्षा जास्त असेल तर रुगाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास असतो. त्यानुसार तुम्ही तुमच्या आहारात काही बदल करणे गरजेचे आहे.

BP control naturally
Hansika Motwani Divorce: 'तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये चढलात, तर...,'' घटस्फोटाच्या महिन्याभरानंतर हंसिका मोटवानीने सोडलं मौन

सगळ्यात आधी तुम्ही खाण्यात बदल करावेत. त्यामध्ये किमान बीपीच्या दिवसांमध्ये हिरव्या पालेभाज्या, ताजी फळं, डाळिंब, आणि डाळींचा समावेश करणं गरजेचं आहे. यात तुम्हाला हवे असलेले फायबर्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात.

तुम्ही नुसतं खाऊन एका जागी बसणं टाळा. दिवसातून किमान अर्धातास चाला. यामध्ये ब्रेक घेऊ नका. मेडीटेशन करा. तुमच्या स्वभावात बदल करा. ताण वाढेल अशा गोष्टी करु नका. श्वासासंबंधीत योगा करा. याने वजन नियंत्रणात राहील आणि ह्रदयावर ताण येणार नाही.

जेवण करताना एक लक्षात ठेवा. सगळ्यात आधी तुम्हाला नुकतीच BPचा त्रास जाणवायला असेल तर काही दिवस मीठ खाणं टाळा. मग जेवणात एकदम थोडंसं मीठ घ्या. एकदम ही सवय लावणं कठीण आहे. पण काही दिवसातच तुम्हाला शरीरात बदल झालेले पाहायला मिळतील.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

BP control naturally
Phone Battery Damage: फास्ट चार्जिंग होणाऱ्या फोनची बॅटरी लगेच खराब होते का? वाचा सत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com