Sakshi Sunil Jadhav
मोबाइल हा सध्याच्या जीवनातला एक अविभाज्य घटक बनला आहे. याचा वापर आपण दिवसभर करतो. त्यामुळे त्याला जास्त चार्जिंग असावी लागते.
आत्तापर्यंत मार्केटमध्ये 40W पासून ते 200w पर्यंत फास्ट चार्जिंग वाले स्मार्टफोन्स लॉंच केले आहेत. पण भारतातल्या मोबाइल ब्रॅंड्समध्ये याचा समावेश नाही.
अनेकांच्या मनात यावरुन प्रश्न निर्माण होतो की, फास्ट चार्जिंग होणाऱ्या फोनची बॅटरी लगेच खराब होते का? चला जाणून घेऊयात.
जेव्हा तुमच्या फोनला फास्ट चार्जिंग होत असते, तेव्हा फोनच्या बॅटरीमध्ये हाय व्होल्टेज करंट मिळत असतो. त्याचा परिणाम बॅटरीच्या टेम्परेचरवर होतो.
जेव्हा तुम्ही जास्त वेळ मोबाइल वापरता तेव्हा बॅटरीचं तापमान त्यातल्या इलेक्ट्रोलाइट्सवर प्रभाव टाकतं याने बॅटरी खराब होऊ शकते.
तुमच्या मोबाइलची बॅटरी फास्ट असेल तरच फास्ट चार्जरने चार्ज करा. नाहीतर तुमच्या फोनची बॅटरी बिघडू शकते किंवा ब्लास्ट करु शकते.
सध्या उन्हाळा असल्यामुळे मोबाइल जास्त तापतो. त्यामुळे चुकीचा चार्जर वापरु नका.
तुम्ही जर फास्ट चार्जर वापरत असाल, तर तुमच्या डिव्हाइसच्या सेटिंग्जमध्ये अॅडॅप्टिव्ह चार्जिंग फीचर ऑन करा. त्याने बॅटरीवर चुकीचा परिणाम होणार नाही.
जास्त फास्ट होणाऱ्या चार्जिंगच्या मोबाइलची बॅटरी ही कधकधी लवकर खराब होऊ शकते. तर मध्यम चार्जिंगची बॅटरी तुलनेने जास्त वापरता येते.