Sakshi Sunil Jadhav
काही खास प्रसंग असला की आपण बाहेर जेवणाचा बेत आखतो आणि एकदा बाहेरच्या पदार्थांची चटक लागली की, आपण घरचं खात नाही.
जेव्हा तुम्ही घरगुती अन्न खात नाही आणि सोडा खातलेले पदार्थ खाता. तेव्हा तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी तुम्ही किवी हे फळ खाऊ शकता. पण कसं त्याचा परिणाम हे आधी वाचून घ्या.
किवीमध्ये भरपूर फायबर असतं. त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि मलावरोध कमी होतो.
तुम्ही रोज किवी खात असाल तर याने आतड्यांची हालचाल (bowel movement)सुधारतं.
किवीमध्ये असलेले एन्झाइम्स अन्न पचवायला मदत करतात. त्यामुळे तुम्ही फळ रात्रीच्या आहारात खाणं जास्त फायदेशीर ठरु शकतं.
नियमित किवी खाल्ल्याने गॅस, अपचन आणि पोट फुगण्याची समस्या कमी होते. किवी शरीरातले विषारी घटक बाहेर काढून टाकते. म्हणजेच तुमचं पोट साफ होतं.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही किवी खूप फायदेशीर आहे. सकाळी रिकाम्या पोटी 1 ते 2 किवी खाल्ल्यावर तुम्हाला जास्त फायदा होईल.
किवी सोलून खाऊ शकता किंवा सॅलड, स्मूदीमध्येही वापरू शकता. दररोज अर्धे किवी खाल्ल्याने पचन व्यवस्थित राहतं आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.