High Blood Pressure: मीठ न खाता ही BPचा त्रास वाढतोय? डॉक्टरांनी सांगितली ४ गंभीर कारणं, आत्ताच व्हा सावध

Hypertension: मीठ कमी खाल्लं तरी हाय ब्लड प्रेशर वाढू शकतं. डॉक्टरांनी अनेक महत्वाची कारणं सांगितली आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.
Avoiding Salt But BP Still High? These Hidden Causes May Be Responsible
Avoiding Salt But BP Still High? These Hidden Causes May Be Responsiblegoogle
Published On

सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये बदल झाल्यामुळे तरुणांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतंय. अपूरी झोप, व्यायामाला आळस, जंक फूड खाण्याची सवय अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागू शकतो. त्यातच आता कॉमन झालेला आजार ब्लड प्रेशर हा वाढत चालला आहे.

काहीजणांना ब्लड प्रेशरचा धोका जास्त असल्यामुळे आहारात बदल करावे लागतात. पण तुम्ही आहारातून मीठ काढून टाकलं असेल आणि ब्लड प्रेशर हाय होत असेल तर आत्ताच सावध होणं गरजेचं आहे. पण याला फक्त मीठचं कारणीभूत ठरत नाही. तज्ज्ञांनी पुढे ५ महत्वाची कारणे सांगितली आहेत.

Avoiding Salt But BP Still High? These Hidden Causes May Be Responsible
LIC Child Investment : दिवसाला १५० रुपये जमा करून मिळवा १९ लाख... LICची जबरदस्त योजना; वाचा संपूर्ण गणित

डॉक्टरांच्या मते, ज्यांना किडनीच्या समस्या, मधुमेह, थायरॉइडच्या समस्या आणि हार्मोनल्समधील बदल यासर्व कारणांमुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं. पण यामध्ये झोपेला खूप महत्व दिलं पाहिजे. कारण जे लोक सहा तासांपेक्षा कमी झोपतात त्.ांना हाय ब्लड प्रेशरच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. यामध्ये झोपताना मोठ्याने घोरणं, सकाळी अचानक डोकं दुखणं आणि दिवसभर सतत थकवा जाणवणं ही धोक्याची लक्षणं असू शकतात.

स्ट्रेस हे सुद्धा BP वाढण्याचं कारण असू शकतं. कामाचा ताण, आर्थिक गोष्टींचा ताण आणि इमोशन स्ट्रेस शांतपणे तुमचं ब्लड प्रेशर वाढवू शकतं. तसेच तुमच्या आहारातली साखर तुमच्या BPवर परिणाम करते. म्हणजे तुम्ही शुगरी ड्रिंक्स, पॅकेबंद ज्यूस, मिठाई आणि प्रोसेस्ड स्नॅक्स याने वजन वाढतं आणि ब्लड प्रेशरचा त्रासही वाढतो.

एका जागी सतत बसल्याने शरीरावर गंभीर परिणाम होतो. त्याने ३० मिनिटं चालल्यावरही तुम्हाला फरक जाणवू शकतो. पण सध्या लोकांना हे कंटाळवाणं वाटतं. त्यामुळे तरुणांपासून वृद्धांपर्यंत BPच्या समस्या वाढत चालल्या आहेत.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Avoiding Salt But BP Still High? These Hidden Causes May Be Responsible
Pavshya Bird: पावश्या पक्षाच्या ओरड्याचा अर्थ काय? माहिती वाचून व्हाल थक्क

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com