LIC Child Investment : दिवसाला १५० रुपये जमा करून मिळवा १९ लाख... LICची जबरदस्त योजना; वाचा संपूर्ण गणित

LIC Child Investment Scheme: LICमध्ये तुम्ही मुलांच्या नावावर गुंतवणूक करणार असाल तर पुढील योजना तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. तुम्हाला यामध्ये भविष्यात १९ लाखांपर्यंत परतावा मिळू शकतो.
LIC Child Investment Scheme
LIC Child Investment SchemegoogleInvest Rs 150 Daily
Published On

सध्याची महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे थोडी गुंतवणूक करणं भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. पण यासाठी तुमच्याकडे जास्त पैसे नसतील तर तुम्ही LICमध्ये कमीत कमी पैशात गुंतवणूक करून १९ लाख रुपये कमवू शकता. महत्वाचं म्हणजे तुम्हाला यामध्ये फक्त दिवसाच्या खर्चातून १५० रुपये बाजूला काढावे लागतील. पुढे आपण याचं गणित समजून घेऊयात.

LIC ची जबरदस्त योजना

LIC मध्ये लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत गुंतवणूक करू शकता. तुम्हाला कमी पैशातही गुंतवणूक करता येते. या स्कीमचे नाव हे न्यू चिल्ड्रन मनी बॅक प्लान (LIC New Children Money Back Plan) असे आहे. तुम्ही मुलांच्या नावावर यात गुंतवणूक करू शकता. याचा परतावा मुलांना १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मिळतो. म्हणजेच तरुणपणी शिक्षणासाठी किंवा इतर कोणत्याही गोष्टींसाठी तुम्हाला फायदा होतो. यात मुलांचं वय १ ते १२ वर्षांच्यामध्ये असेल तर तुम्ही गुंतवणूक करू शकता.

LIC Child Investment Scheme
Blue Aadhaar Card Update : लहान मुलांच्या आधार कार्डाचे नियम बदलले; आता आणखी २ कागदपत्रांची पडली भर, जाणून घ्या यादी

१९ लाख रुपये मिळवण्यासाठीचे गणित

तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही पुढील गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे. तर तुम्ही दिवसाला १५० रुपये वाचवून महिन्याला ४५०० रुपये जमा करू शकता. जे एका वर्षात ५५,००० रुपये होतील. जर तुम्ही ही रक्कम एलआयसी न्यू चिल्ड्रेन मनी बॅक पॉलिसीमध्ये गुंतवली, तर २५ वर्षांनंतर मॅच्युरिटीला तुम्ही जमा केलेली रक्कम १४ लाख रुपये होईल.

यामध्ये बोनस आणि मॅच्युरिटी बेनिफिटचे गणित केले तर एकूण अंदाजे १९ लाख रुपये सहज होतील. अशा प्रकारे तुम्ही भविष्यात लाभ मिळवू शकता. नियमांनुसार, तुमच्या मुलाला वयाच्या १८, २० आणि २२ व्या वर्षी मूळ विमा रकमेच्या २०% रक्कम देईल. वयाच्या २५ व्या वर्षी, उर्वरित ४०% रक्कम, ठेवीवर LICने दिलेल्या बोनससह देण्यात येईल.

LIC Child Investment Scheme
Jio Recharge: 126 GB डेटा अन् 84 दिवसांची वैधता, हा आहे Jioचा सर्वात स्वस्त रिचार्ज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com