Blue Aadhaar Card Update : लहान मुलांच्या आधार कार्डाचे नियम बदलले; आता आणखी २ कागदपत्रांची पडली भर, जाणून घ्या यादी

Sakshi Sunil Jadhav

UIDAIचे नवे नियम

नुकतंच UIDAI ( Unique Identification Authority of India )ने लहान मुलांच्या ब्लू आधार कार्डासंदर्भात महत्वाचे बदल केले आहेत.

UIDAI new rules

लहान मुलांचे आधार कार्ड

तुम्ही जर 5 वर्षांखालील मुलांचं आधार कार्ड बनवणार असाल तर बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन अनिवार्य करण्यात आलं आहे. तसेच काही नवीन कागदपत्रांनाही वैध मान्यता देण्यात आली आहे.

UIDAI new rules

cci सर्टिफेकेटला मान्यता

चाइल्ड केअर इन्सिट्यूशनमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी डिस्टिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसरने दिलेलं सर्टिफिकेट आता वैध कागदपत्र म्हणून स्वीकारलं जाईल.

Aadhaar card for kids

OCI कार्डधारकांसाठी नवीन नियम

OCI कार्डधारकांसाठी आता आधार नोंदणीच्या वेळी वैध परदेशी पासपोर्ट आणि OCI कार्ड दाखवणं महत्वाचं आहे.

Blue Aadhaar Card

बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन बंधनकारक

मुलाचे आधार कार्ड बनवताना आता आई किंवा वडिलांपैकी एकाचं बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करणं महत्वाचं ठरेल.

biometric authentication Aadhaar

पालकांचे आधार कार्ड

मुलांच्या आधार कार्डासाठी आई-वडिलांकडे किंवा कायदेशीर पालकांकडे वैध आधार कार्ड असणं महत्वाचं असेल.

biometric authentication Aadhaar

HoF नियम लागू

5 वर्षांखालील मुलांचं आधार कार्ड आता Head of Family (HoF) पद्धतीनुसार असेल.

child Aadhaar documents

जन्मतारीख आणि नातेसंबंधाचा पुरावा

मुलांच्या आधार कार्डासाठी जन्मतारखेचा आणि कुटुंबाशी असलेल्या नात्याचा पुरावा सादर करणं अनिवार्य ठरेल. तसेच लहान मुलांचे फिंगरप्रिंट घेतले जाणार नाहीत.

UIDAI notification

NEXT: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

confidence building
येथे क्लिक करा