Heatstroke Tips: उष्माघात टाळण्यासाठी 'या' गोष्टी करणं टाळा, वाचा कशी घ्यायची काळजी?

Heatwave Alert: उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढत चालला आहे. त्यामुळे तुम्ही काही सोप्या उपायांनी या धोक्यापासून वाचू शकता.
Heatwave Alert
Heatstroke Tipsgoogle
Published On

सध्या उन्हाचा पारा वाढत चालला आहे. या दिवसात सकाळी १० वाजल्यापासून तुम्हाला घामाच्या धारा दिसायला लागतात. या ऋतूत तुम्हाला उष्माघाताने होणाऱ्या आजारांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे तुम्ही काही सोप्या उपायांनी आणि सवयींनी तुमची काळजी घेऊ शकता. तसेच काही गोष्टीं करणं टाळू शकता. यासंदर्भात आरोग्य विभागाकडून जागी सूचना देण्यात आल्या आहेत.

उन्हाळ्यात काय करावे ?

  • पुरेसं पाणी पित राहा. तहान लागली नसली तरीही दर एक तासाच्या फरकाने थोडं थोडं पाणी प्या.

  • घराबाहेर पडताना टोपीचा वापर आवर्जून करा.

  • शक्य असल्यास दुपारी १२ ते ४ यावेळेत घराबाहेर पडू नका.

  • उन्हापासून वाचण्यासाठी घरातले पडदे आणि झडपांचा वापर करा.

  • उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातल्या माहितीचा वापर करा.

Heatwave Alert
Snake Smell: हे ५ पदार्थ ठेवा दाराजवळ, सापांचा धोका होईल कायमचा दूर
  • हलके, पातळ आणि सुती कपडे वापरा.

  • प्रवासात पिण्याचं पाणी सोबत ठेवा.

  • उन्हात काम करत असाल तर टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोकं, मान, चेहरा झाका.

  • शरीरातले पाण्याचे प्रमाण कमी होत असेल तर ओआरएस, लस्सी, कैरीचे पन्हं, लिंबू-पाणी, ताक याचं सेवन करा.

  • अशक्तपणा, डोकेदुखी सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.

  • गुरांना गोठ्यात ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.

उन्हाळ्यात काय करु नये ?

  • उन्हात जास्त कष्टाची कामे करू नका.

  • दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेय सेवन करु नका.

  • दुपारी १२ ते ४ च्या दरम्यान घराबाहेर जाऊ नका.

  • उच्च प्रथिनेयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका.

  • लहान मुलं किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या खोलीत आणि पार्क केलेल्या वाहनात ठेवू नका

  • बाहेर तापमान जास्त असेल तर शारीरिक श्रमाची कामे करणं पूर्णपणे टाळा.

    भर उन्हात स्वयंपाक करु नका. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारं आणि खिडक्या उघड्या ठेवा.

  • गडद घट्ट व जाड कपडे घालण्याची सवय टाळा.

Heatwave Alert
Food Poisoning Case: पाणीपुरी ठरली जीवघेणी! 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, 18 जण आजारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com