Rohini Gudaghe
उन्हाळ्यात पांढऱ्या रंगाचे कपडे घाला. पांढरा रंगाचे कपडे घातल्याने गरम होत नाही.
उन्हाळ्यात घाम जास्त येतो. त्यामुळं या काळात सुती कपडे वापरावे.
उन्हाळ्यात सिंथेटिक कपड्यांचा वापर टाळावा.
उन्हाळ्यात गडद रंगांचे कपडे टाळावेत. कारण गडद रंग सूर्यकिरणांना शोषून घेतात.
उन्हाळ्यात पांढरा, पिवळा, आकाशी अशा फिकट रंगांच्या कपड्यांना प्राधान्य द्यावे.
उन्हाळ्यात फिटिंगचे कपडे टाळावेत. ढगळे किंवा सैल कपडे वापरावेत.
उन्हाळ्यात लांब बाह्यांचे कपडे वापरल्याने सूर्यकिरणांपासून हातांचं रक्षण होते.
लीलनचे कापड सुती कपड्यापेक्षा जास्त हवेशीर असते. त्यामुळे उन्हाळ्यात लीलनचे कपडे वापरणे फायदेशीर ठरते.