Heart Attack: एकटे आहात अन् हार्ट अटॅक आला; घाबरू नका, 'असा' वाचवा स्वतःचा जीव, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Emergency Care: एकट्यावेळी हार्ट अटॅक आल्यास घाबरू नका. डॉक्टरांनी सांगितलेले तातडीचे उपाय वेळेवर केल्यास जीव वाचण्याची शक्यता वाढते. ही माहिती प्रत्येकासाठी उपयुक्त आहे.
How to Survive Heart Attack Alone
Heart Attack Emergency Tipsgoogle
Published On

महाराष्ट्रातच नाही तर सुंपूर्ण जगभरात हार्ट अटॅकचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हा जीवघेणा आजार कोणत्याही वयाच्या व्यक्तींना होतो. बऱ्याचदा लोकांना याची लक्षणंच माहित नसतात. त्यामुळे दुर्लक्षित केलेल्या समस्यांचा परिणाम तुम्हाला केव्हाही आणि कुठेही पाहायला मिळू शकतो. कारण हार्ट अटॅक हा कधीच वेळ काळ बघून येत नाही. तरुण वयात आणि फीट राहूनही अनेकांना हार्ट अटॅक येतो.

कधी कधी हार्ट अटॅक येताना व्यक्ती एकटीच असते. अशा परिस्थितीत नेमकं काय करावं हे कळत नाही. भीतीमुळे माणूस पॅनिक होतो आणि वेळेवर योग्य पावलं उचलली नाहीत तर जीव वाचवणं कठीण होऊन जातं. डॉक्टरांच्या मते, अशा वेळी काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. पुढे आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.

हार्ट अटॅकची प्रमुख लक्षणे कोणती?

हार्ट अटॅकमध्ये डावा हात अचानक दुखतो, छातीत दुखतं, दबाव जाणवतो किंवा घट्टपणा जाणवतो, अचानक जास्त प्रमाणात घाम येतो, मेंदू काम करत नाही, श्वास घ्यायला त्रास होतो, अचानक थंडी वाजते, घाबरल्यासारखं वाटतं. कधी कधी रात्री अचानक छातीत जळजळ किंवा अ‍ॅसिडिटी होते, ही लक्षणे तुम्हाला जाणवत असतील तर तुम्ही अजिबात दुर्लक्ष करु नका.

How to Survive Heart Attack Alone
Post Office MIS: घरबसल्या मासिक उत्पन्न हवंय? 'हा' आहे सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय; दरमहा ₹9,250 हमखास व्याज

एकट्यात हार्ट अटॅक आल्यास काय करावे?

डॉक्टरांनी सांगितलेले काही तातडीचे उपाय जीव वाचवण्यास मदत करू शकतात. त्यांचे व्यवस्थित पालन करा.

पहिला स्टेप

हार्ट अटॅकची शंका वाटत असेल तर लगेचच शारीरिक हालचाल थांबवा. चालणं-फिरणं लगेच बंद करून एका जागी शांतपणे बसून राहा. हालचाल केल्याने चक्कर येऊन पडण्याचा धोका वाढतो.

दुसरी स्टेप

सुमारे ४५ अंश कोनात थोडे पुढे झुकून बसा. त्याने रक्तप्रवाह थोड्या प्रमाणात सुधारु शकतो. धडधड कमी होऊ शकते.

तिसरी स्टेप

घरात डिस्प्रिन (Aspirin) असल्यास एक गोळी चावून खा. मात्र, डॉक्टरांनी आधीपासूनच डिस्प्रिन घेण्यास मनाई केली असेल तर घेऊ नका. ही गोळी अ‍ॅम्ब्युलन्स येईपर्यंत महत्त्वाचा वेळ मिळवून देते.

चौथी स्टेप

लगेचच मोबाइलवरून अ‍ॅम्ब्युलन्सला फोन करा. शक्य असल्यास कुटुंबीयांना कॉल किंवा मेसेज करून परिस्थितीची माहिती द्या.

पाचवी स्टेप

घरातील सर्व दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा, जेणेकरून मदत लवकर पोहोचू शकेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॅनिक होऊ नका. शक्य तितकं शांत राहणं गरजेचं आहे.

महत्त्वाची टीप

वरील उपाय हे हार्ट अटॅकवरील उपचार नाहीत, मात्र हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंतचा अमूल्य वेळ मिळवून देतात. योग्य वेळी घेतलेली ही पावलं जीव वाचण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढवू शकतात. छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास किंवा वर दिलेली लक्षणे जाणवत असतील तर त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

How to Survive Heart Attack Alone
Traditional Sarees: ऐनवेळी साडी निवडताना गोंधळ होतोय? या ५ प्रकारच्या साड्या ठेवा कपाटात; आयुष्यभर नेसा अन् दिसा रॉयल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com