Heart Attack: छातीतील जळजळ फक्त अ‍ॅसिडिटी नव्हे, हार्ट अटॅकचाही असू शकतो धोका; ही 4 लक्षणे दुर्लक्ष करू नका

Acidity Vs Heart Attack: छातीत जळजळ किंवा हलका त्रास अ‍ॅसिडिटी समजू नका. हीच लक्षणे हार्ट अटॅकचा इशारा असू शकतात. वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि हृदयविकार टाळा.
Chest Pain
Heart Attacksaam tv
Published On
Summary

छातीत सतत जळजळ होणे हे फक्त अ‍ॅसिडिटी नसते.

छातीत वेदना, दम लागणे, थंड घाम येणे ही गंभीर लक्षणे आहेत.

अशा वेळी घरगुती उपाय न करता तातडीने डॉक्टरांकडे जा.

अनेकदा छातीत हलका त्रास, जळजळ किंवा अॅसिडिटीसारखी लक्षणे लोक किरकोळ समजतात आणि दुर्लक्ष करतात. त्यातला एक वर्ग घरगुती उपचार करतो किंवा काही मेडीसिन्सचा वापर करतो. पण हीच लक्षणे गंभीर आजाराचे संकेत ठरू शकतात. तज्ज्ञांनी केलेल्या रिसर्चमध्ये काही महत्वाच्या बाबी समोर आल्या त्यामध्ये ही गंभीर समस्या नजरेत आली. जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.

जर तुम्हाला छातीत हलका त्रास आणि अॅसिडिटी जाणवत असेल. तर चहामुळे किंवा पचनाच्या समस्येमुळे झाली असावी हा समज चुकीचा आहे. सोबत उजव्या छातीच्या बाजूस जळजळ, पाठदुखी आणि पोट साफ न होण्याची समस्या वाढत गेली. तर डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला आहे. अन्यथा तुम्हाला 24 तासांपूर्वी हार्ट अटॅक येऊ शकतो. रक्तवाहिन्या पूर्णपणे ब्लॉक होऊ शकतात.

हृदयविकार आणि अॅसिडिटीतील साम्य काय?

तज्ञांच्या मते, अॅसिडिटी आणि हार्ट अटॅकची सुरुवातीची लक्षणे सारखी वाटू शकतात. जेवणानंतर छातीत होणारी जळजळ सामान्यतः अॅसिडिटीचे लक्षण असते आणि अँटासिड घेतल्यावर कमी होते. पण हार्ट अटॅकमध्ये छातीत दाब, ताण, वेदना जाणवतात आणि ही वेदना हात, मान किंवा पाठीत पसरते. त्यासोबत दम लागणे, थंड घाम येणे, मळमळ किंवा थकवा जाणवणे अशी लक्षणेही दिसू शकतात.

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या तज्ञ डॉ. मिशेल ओ'डोनोघ्यू सांगतात की कधी कधी डॉक्टरांनाही अॅसिडिटी आणि हृदयविकाराच्या वेदनेत फरक ओळखणे अवघड जाते. त्यामुळे कोणत्याही अशा वेदना आल्यास तातडीने ईसीजी किंवा इतर तपासण्या करणे आवश्यक आहे.

ही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या

1. छातीत सतत किंवा वेगळा वेगळा त्रास होणे.

2. खांदा, मान, घसा किंवा पाठीत पसरलेली वेदना वाढणे.

3. श्वास घ्यायला त्रास होणे, थंड घाम येणे.

4. मळमळ, चक्कर येणे किंवा थकवा जाणवणे.

Chest Pain
Breathing Problems: रात्री झोपताना श्वास घ्यायला त्रास होतोय अन् वजनही वाढतंय? असू शकतो हार्ट अटॅकचा धोका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

जर तुम्हाला ही लक्षणे जाणवत होती आणि तात्पुरती कमी झाली तरी त्यांना दुर्लक्षित करू नका. वेळेत वैद्यकीय तपासणी केल्यास हृदयविकार ओळखून योग्य उपचार करता येतात आणि जीव वाचवता येतो. त्यामुळे छातीत कोणताही त्रास झाल्यास त्याला किरकोळ समजून थांबू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण वेळेत घेतलेला निर्णय जीव वाचवू शकतो.

Chest Pain
Cholesterol Awareness: थकवा यतोय, हातपाय सुन्न पडतात; दुर्लक्ष करू नका अन्यथा होईल गंभीर आजार, वाचा तज्ज्ञांनी काय सांगितलं
Q

छातीत जळजळ झाली की ती अॅसिडिटीच असते का?

A

नाही, प्रत्येक छातीतील जळजळ अॅसिडिटी नसते. काहीवेळा ही लक्षणे हार्ट अटॅकची सुरुवात असू शकतात.

Q

अॅसिडिटी आणि हार्ट अटॅकमध्ये फरक कसा ओळखायचा?

A

अॅसिडिटीमध्ये जेवणानंतर जळजळ होते. पण हार्ट अटॅकमध्ये वेदना हात, मान किंवा पाठीत पसरते.

Q

हार्ट अटॅकपूर्वी कोणती लक्षणे दिसतात?

A

छातीत दाब, थंड घाम येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, मळमळ आणि थकवा ही सुरुवातीची लक्षणे आहेत.

Q

अशा लक्षणांवर काय करावे?

A

कोणतीही अशी वेदना आल्यास स्वतः उपचार न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि ईसीजी तपासणी करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com