

सध्याची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलली आहे. हा बदल सध्याच्या तरुणांमध्ये खूप कॉमन असतो. म्हणजे रात्री उशीरापर्यंत पार्टी करणं, उशीरापर्यंत कामं करणं आणि उशीर झालाय म्हणून बाहेरून ऑर्डर करून खाणं. ही सवय फक्त तरुणच नाही, तर प्रौढांनाही लागलीये. पण याने तुम्हाला तुमचा जीव गमवावा लागू शकतो. असं अमेरिकेतल्या तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
तज्ज्ञांच्या मते, तुम्ही तुमच्या जीवनशैलीवर वेळीच काम केलं नाही, तर भविष्यात तुम्हाला हार्ट अटॅकच्या धक्क्याला सामोरं जावं लागू शकतं. पण तुम्ही काही सोप्या गोष्टी फॉलो केल्यात तर म्हातारपणीही तुम्ही निष्काळची राहाल. तुमच्या आजुबाजुला हार्ट अटॅकची लक्षणंही फिरकणार नाहीत. चला जाणून घेऊयात.
1. आहारातला बदल
तुमच्या आहारातले पदार्थ तुम्हाला हार्ट अटॅकच्या धोक्याला कारणीभूत
ठरतात. त्यामध्ये तुम्ही तळलेले, जास्त प्रक्रिया केलेले, ऑयली फूड यांसारखे पदार्थ टाळा. कारण याने तुमचं कोलेस्ट्रॉल वाढतं. त्याऐवजी डाळ, चीज, अंडी, टोफू, दही आणि सोयाबीन हे पदार्थ आहारात ठेवा.
2. व्यायामाची सवय
तज्ज्ञांच्या मते, तुम्ही व्यायाम करत नसाल तर तुम्हाला हार्ट अटॅकच्या समस्येला कोणत्याही वयात सामोरं जावं लागू शकतं. त्यासाठी तुम्ही दिवसातून फक्त १५० मिनिटं व्यायाम केलात तरी फायद्याचं ठरेल. पण ही सवय महिला आणि पुरुषांमध्ये असायली हवी.
3. पुरेशी झोप
बदलत्या जीवनशैलीमुळे उशीरापर्यंत काम, मग उशीरा जेवण आणि उशीरा झोपणं तुम्ही टाळलं पाहिजे. तुम्ही सलग ६ते ७ तास झोपलं पाहिजे.
4. रोज तपासणी करणे
काही रुग्णांना रोजच्या रोज तपासणी करण्याची सवय असते. विशेष म्हणजे, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल असे काही आजार घरच्या घरी तपासले जातात. ही एक योग्य सवय आहे. मात्र तुम्ही तिशीनंतर तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.
5. धुम्रपानाची सवय
तज्ज्ञांच्या मते, हार्ट अटॅकच्या सर्वात मोठ्या कारणांपैकी एक कारण म्हणजे धुम्रपान करण्याची सवय. तुम्ही ही एक नुकसानदायक सवय सोडून तुमचं आयुष्य कुटुंबासोबत उत्तम रित्या जगू शकता.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.