Sakshi Sunil Jadhav
तुमच्याही चष्म्यावर जर बारीक बारीक स्क्रॅच असतील तर तो चष्मा फेकून देऊ नका. पुढील टिप्स वाचा.
लेन्सवर एक थेंब सौम्य लिक्विड डिश सोप लावून कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे धूळ आणि तेलकट थर दूर होतो.
खूप गरम किंवा थंड पाण्याऐवजी कोमट पाण्याने लेन्स स्वच्छ करा. त्यावरील घाण सहज निघून जाईल.
लेन्स स्वच्छ करताना नेहमी मायक्रोफायबर कापडाचाच वापर करा. त्याने आणखी स्क्रॅच पडण्याची शक्यता कमी होते.
शर्ट, साडीचा पदर किंवा साधा रुमाल वापरल्यावर लेन्सवर बारीक ओरखडे पडू शकतात.
चांगल्या दर्जाचा लेन्स क्लिनिंग स्प्रे वापरल्यावर डाग आणि बारीक रेषा कमी दिसू लागतात.
लेन्सवरची धूळ असेल तर आधी ती पाण्याने धुवून घ्या. थेट पुसल्यावर धुळीमुळे स्क्रॅच वाढू शकतात.
दररोज लेन्स साफ ठेवल्यास घाण साचत नाही आणि स्क्रॅच अधिक स्पष्ट दिसत नाहीत.
स्क्रॅच खूप खोल असतील तर घरगुती उपाय करण्याऐवजी ऑप्टिकल तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरेल.