Sakshi Sunil Jadhav
मे- जून या महिन्यात पर्यटक अनेक ऐतिहासिक ठिकाणांना भेट देत असतात. हा काळ सुट्ट्यांचा असतो. त्यात पहिल्या पावसाचं सौंदर्य पाहण्यासाठी लोक फिरायला जात असतात.
तुम्ही जर या दिवसांमध्ये ऐतिहासिक ठिकाणी म्हणजे रायगड जिल्ह्यातल्या जंजिरा किल्ल्याला भेट देणार असाल तर थांबा.
जंजिरा किल्ला हा येत्या २६ मेपासून बंद राहणार आहे. पर्यटकांना तिथे जाण्यास बंदी केली जाईल.
पावसाळी हंगामामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेतला आहे.
मान्सूनच्या काळात समुद्र खवळलेला असल्या कारणाने बोट प्रवास जास्त धोकादायक ठरू शकतो.
जोरदार पाऊस, वादळी वारे आणि कमी दृश्यमानता यामुळे किल्ल्यापर्यंत पोहोचणं अवघड होतं. मान्सून काळात जंजिरा किल्ला बंद ठेवण्याची प्रथा प्रशासनाकडून दरवर्षी राबवली जाते.
किल्ल्याकडे जाणारी बोटसेवा हवामानानुसार बंद किंवा मर्यादित ठेवली जाऊ शकते.
जंजिरा किल्ल्याला भेट देण्याचा विचार करणाऱ्या पर्यटकांनी बंदी कालावधी लक्षात घेऊनच प्रवासाचं नियोजन करा.
पावसाळा संपल्यानंतर आणि हवामान अनुकूल झाल्यानंतर किल्ला पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात येईल.