High Heels Wearing Tips: High Heels घालणे आवडते? मग या गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष

High Heels: हाय हील्सची फॅशन प्रत्येक युगातील महिलांसाठी हा एक उत्तम फॅशन ट्रेंड आहे, हे त्स्लस्टायलिश लुक देतात, ज्यामुळे त्या इतरांपेक्षा वेगळ्या दिसता
High Heels
High Heels Wearing TipsSaam Tv

सध्या आपल्याला विविध फॅशन पाहायला मिळते. मात्र अनेकदा काहीजण फॅशन शर्यतीच्या कोणत्याही थराला जायला तयार झालेले आपण पाहिले आहे. फॅशनचा खरा उद्देश आरामादायी फॅशनेबल दिसणे असा आहे. फॅशनमध्ये मुख्य भाग येतो म्हणजे हाय हिल्सचा. बाजारात आपल्याला अनेक विविध प्रकारच्या हाय हिल्स विकत मिळतात.सध्या तरुणींमध्ये हाय हिल्सची क्रेझ मोठ्या प्रमाणात असलेली आपण पाहत असतो.

High Heels
Lifestyle To Prevent Cancer: कर्करोग टाळाण्यासाठी जीवनशैलीत करा 'हे' छोटे बदल

हाय हिल्स जसा फॅशन(fashion )चा मुख्य भाग आहे त्याप्रमाणेच उंच दिसण्यासाठी ही बऱ्याच तरुणी हाय हिल्स घालत असतात. त्यामुळे हाय हिल्स घालण्याचे फायदे आहेत तितकेच हाय हिल्समुळे तितके तुमच्यासाठी नुकसान देखील आहे. यामुळे तुम्हाला अनेक आरोग्यासंबंधीत समस्यांना सामोरे जावे लागते.

पाठदुखी

हाय हिल्स घातल्याने बऱ्याचदा पाठदुखी संबंधित वेदना जाणवतात. त्यामुळे शक्य असेल तितके हाय हिल्स घालण टाळाव.

गुडघेदुखी (knee Pain )

हाय हिल्स सातत्याने घातल्याने गुडघेदुखीची समस्या निर्माण होते. कारण हाय हिल्समुळे शरीराच्या सांध्यावर दबाव पडतो. ज्यामुळे ती समस्या वाढते.

पायदुखी

बऱ्याच महिला हायहिल्स घालून अनेक कार्यक्रमास जातात. पंरतू जास्त वेळ हायहिल्स घातल्याने पायांवर ताण येतो त्यामुळे भयानक पायदुखीची समस्या जाणवते.

बॉडी पोश्चर

महिलांनी हाय हिल्स वारंवार घालण्याची सवय लवकरात लवकर सोडली पाहिजे. अनेकदा या सवयीमुळे तुमचा बॉडी पोश्चर बिघडू शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

High Heels
Healthy Lifestyle: 'या' सिंपल टिप्सने आयुष्यभर शरीर राहील तरुण आणि तंदुरुस्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com