Wedding Viral Video: डिजे अन् बॅन्जो ही तर बोरींग फॅशन; स्वत:च्याच लग्नात नवरदेवानं थेट हरिपाठावर धरला ठेका

Viral Video Of Groom: लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्याचा महत्त्वाचा क्षण असतो. लग्नानंतर नवरा- नवरीचे पूर्ण आयुष्यच बदलून जाते. त्यामुळे अनेकजण मोठ्या धुमधडाक्यात लग्न करतात. लग्नात अनेकदा ढोल-ताशा, डिजेच्या तालावर वऱ्हाडीमंडळी नाचतात. परंतु तुम्ही कधी हरिपाठाच्या तालावर नवऱ्याला नाचताना पाहिलय का? असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Wedding Viral Video
Wedding Viral VideoSaam Tv

लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्याचा महत्त्वाचा क्षण असतो. लग्नानंतर नवरा- नवरीचे पूर्ण आयुष्यच बदलून जाते. त्यामुळे अनेकजण मोठ्या धुमधडाक्यात लग्न करतात. लग्न करताना सर्व विधी करतात. तसेच घोड्यावरुन वरात काढतात, डिजे लावतात. परंतु तु्म्ही कधी डिजे ऐवजी हरिपाठावर वऱ्हाडीमंडळी आणि नवरदेवाने ठेका धरलेला पाहिलाय का? असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

लग्नात प्रत्येकजण डिजेच्या तालावर डान्स करतात. सध्याच्या काळात डान्सशिवाय लग्न अपूर्णच असल्यासारखे वाटते. परंतु हा डान्स डिजेवर नाही तर हरिपाठाच्या तालावर धरला आहे. व्हायरल व्हिडिओत नवरा- नवरी आणि संपूर्ण वऱ्हाडीमंडळी हरिपाठाच्या तालावर ठेका धरताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओत नवरा- नवरीची हळद असल्याचे दिसत आहे. हळदीच्या दिवशी सर्वांनी वारकरी संप्रदायाचा पारंपारिक पोषाख परिधान केलेला दिसत आहे. यावर त्यांनी पांढरी टोपी, गळ्यात टाळ घातल्याचे दिसत आहे. संपूर्ण वऱ्हाडीमंडळी एका रिंगणात हरिपाठाच्या तालावर नाचताना दिसत आहे. हा व्हिडि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Wedding Viral Video
Stunt Video: स्टंट की मृत्यूला निमंत्रण? रील बनविण्यासाठी तरूण भररधाव कारला लटकला; थरारक VIDEO व्हायरल

tushargharpende_17 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. नेटकऱ्यांनी नवरदेवाच्या या अनोख्या स्टाईलवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 'राम कृष्ण हरी', 'अतिशय सुंदर', 'आपली संस्कृती जपणारी माणसं', असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे.

Wedding Viral Video
चायवाल्या डॉलीची रॉयल एंट्री, बुर्ज खलिफावर घेतला कॉफीचा आस्वाद; Video व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com