Harmful Foods : शरीरासाठी विषच! हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, लिव्हरसाठी ठरतील हानिकारक

Fatty Liver Disease : तुम्हालाही फॅटी लिव्हरच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर जाणून घेऊया कोणते पदार्थ आहारासाठी हानिकारक आहेत.
Harmful Foods
Harmful FoodsSaam Tv
Published On

Food Items Harmful For Body :

आपल्या आहाराचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी आणि इतर अनेक गोष्टींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.

डॉक्टरांपासून ते वडिलधाऱ्यांपासून प्रत्येकजण आपल्याला आरोग्यदायी पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. कामाचा वाढता ताण आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे (Habits) लोकांच्या आरोग्यावर (Health) परिणाम होत आहे. अनेकजण फास्ट फूड (Food) खाताना दिसत आहे. ज्यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण वाढते त्यामुळे फॅटी लिव्हरसारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे.

जर तुम्हालाही फॅटी लिव्हरच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर जाणून घेऊया कोणते पदार्थ आहारासाठी हानिकारक आहेत.

1. प्रक्रिया केलेले कार्ब

शरीराला आणि यकृताला निरोगी ठेवायचे असेल तर आहारातून प्रक्रिया केलेल कर्बोदके खाणे बंद करा. यामुळे यकृताला हानी पोहोचू शकते. प्रक्रिया केलेले कार्बोहायड्रेट प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये येतात. ज्यामध्ये सोडियम आणि सॅच्युरेटेड फॅट जास्त प्रमाणात असते.

Harmful Foods
Pregnancy Weight Loss : महिलांनो, डिलिव्हरीनंतर वजन आटोक्यात आणायचे आहे? या टिप्स फॉलो कराच

2. जास्त प्रमाणात मीठ

अतिप्रमाणात मीठाचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरते. डब्ल्यूएचओने याबाबत इशारा दिला आहे. आहारात जास्त प्रमाणात सोडियम असल्यास उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि पक्षाघातच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. तसेच यकृताला देखील हानी पोहोचू शकते.

3. सॉफ्ट ड्रिंक्स

सॉफ्ट ड्रिंक्स हा सध्याच्या काळात आहाराचा भागच बनला आहे. जर तुम्ही देखील सतत सॉफ्ट ड्रिंक्स पित असाल तर आरोग्याला नुकसान होऊ शकते. याच्या अतिसेवनाने नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज होण्याची शक्यता असते.

Harmful Foods
Relationship Tips : या गोष्टींमुळे तुम्ही कधीच जगणार नाही सुखाने, नात्यात पडते फूट! वेळीच घ्या काळजी

4. साखरयुक्त पेय

साखरेचे पेय तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचवू शकतात. सतत याचे सेवन केल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. ज्यामुळे इन्सुलिनचा प्रतिकार होऊ शकतो.

5. पॅरासिटामोल

अनेकदा सर्दी-खोकला किंवा सामान्य आजारावर आपण पॅरासिटामोल घेतो. ज्याच्या आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. याचा जास्त प्रमाणात वापर केल्यास ते विषारी होऊ शकते आणि यकृताचे नुकसान होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com