नातं कोणतही असो ते जपण्यासाठी खूप वेळ आणि भावना लागतात. जेव्हा काही नात्यात सुरळीत आणि आनंदाने जगतात. कोणत्याही नात्यात अधिक महत्त्वाचा असतो तो विश्वास.
नातं म्हटलं की, त्यात रुसवे-फुगवे येतात परंतु, हा राग कितपर्यत ठेवायला हवा हे प्रत्येक जोडप्याला कळायला पाहिजे. बरेचदा नात्यात आपण अशा चुका करतो ज्यामुळे नात्यात फूट पडते. नातं घट्ट करण्यासाठी केवळ प्रेम पुरेसे नाही तर त्यात अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. ज्यामुळे नात्यात दूरावा येऊन पश्चातापाची वेळ येते. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर.
1. आदर न करणे
नात्यात (Relation) अनेकदा समोरच्याचा मान राखण्यासाठी आपण अशा अनेक गोष्टी करतो. ज्यामुळे अपमान सहन करावा लागतो. नात्यात एक -दोनदा व्यक्ती अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करु शकते. पण प्रत्येकवेळी स्वत:च्या स्वाभिमानाला सगळ्यात आधी प्राधान्य द्या.
2. फसवणूक
खोट्या आणि फसवणूक वाटणाऱ्या गोष्टी नात्यातील विश्वासाची भावना परत येऊ शकत नाही. खोटे बोलणारी किंवा फसवणूक करणारी व्यक्ती प्रत्यक्षात सुधारणा करत असली तर त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे संशयाने पाहिले जाते. यामुळेच अशी नाती तुटतात
3. अंमली पदार्थांचे व्यसन
जर तुमचा पार्टनर (Partner) अंमली पदार्थांचे सेवन करत असेल तर वेळीच त्याला रोखा. नात्यात या गोष्टी एका वेळेनंतर तुमच्या नात्यात फूट पाडू शकतात. ज्यामुळे नाते तुटते.
4. कर्ज घेण्याची सवय
कधी कधी छोट्या कर्जापासून (Loan) सुरु झालेली सवय कधी मोठ्यात गोष्टीत बदलते हेही कळत नाही. पण जेव्हा असे घडते तेव्हा तुमच्या नात्यावर परिणाम होतो. बरेचदा पार्टनर आपल्या जोडीदाराकडून पैसे उधार घेतो. अशावेळी नाते तुटण्याच्या मार्गावर येते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.