Smoking Effect On Brain: धुम्रपान फक्त फुफ्फुसाठी नव्हे तर मेंदूसाठीही हानिकारक; जाणून घ्या सविस्तर

Smoking Injurious to Health: धुम्रपान करणे हे आरोग्यासाठी हानिकारक असते. त्याचा तुमच्या शरीरावर खूप जास्त वाईट परिणाम होतो. धुम्रपानाचा मेंदूवर खूप वाईट परिणाम होतो.
Smoking Effect On Brain
Smoking Effect On BrainSaam Tv
Published On

Smoking Effect On Health:

धुम्रपान करणे हे आरोग्यासाठी हानिकारक असते. त्याचा तुमच्या शरीरावर खूप जास्त वाईट परिणाम होतो. हे फुफ्फुसांसाठी धोकादायक असते. धुम्रपान केल्याने कर्करोगचा धोका निर्माण होतो. तसेच शरीराच्या इतर भागांवरदेखील परिणाम होतो. धुम्रपानाचा मेंदूवरदेखील खूप वाईट परिणाम होतो.

एका रिसर्चमध्ये धुम्रपानाचा मेंदूवर परिणाम होतो असे सांगण्यात आले आहे. धपम्रपान केल्याने मेंदूचे विकार होऊ शकतात. त्यामुळे मेंदूचा आकार लहान होतो. आतापर्यंत धुम्रपान फुप्फुसे आणि हृदयासाठी हानिकारक असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु ते मेंदूसाठीही खूप हानिकार आहे. त्यामुळे धुम्रपान करु नये.

एका रिसर्चनुसार, धुम्रपान करणाऱ्या लोकांचे विश्लेषण करण्यात आले. त्यात अनुवंशिकता, धुम्रपान आणि मेंदूचा एकमेकांशी संबंध असल्याचे लक्षात आले. या अभ्यासानुसार, एखादी व्यक्ती जेवढी जास्त प्रमाणात धुम्रपान करते तेवढा जास्त त्याच्या मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे स्मृतीभ्रंशाचा धोका वाढतो. वाढते वय आणि धुम्रपान यामुळे स्मृतीभंश होण्याची जास्त शक्यता असते. हा धोका टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.

Smoking Effect On Brain
Glowing Skin : आंघोळीपूर्वी दूध चेहऱ्याला लावा, त्वचा होईल मुलायम आणि चमकदार

जीवनशैलीत बदल

प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करायला हवा. त्यासाठी व्यायाम आणि योगाने आणि पौष्टिक आहार घ्यायला हवा. व्यायामामुळे स्मृतीभ्रंशाचा धोका कमी होतो. सतत हालचाल करणे मेंदूसाठी चांगले असते.

पौष्टिक आहार

स्मृतीभंशाचा धोका कमी करण्यासाठी पौष्टिक आहार करावा. आहारात फळे, पालेभाज्या यांचा समावेश करावा. यामुळे शरीराला फायदा होईल.

Smoking Effect On Brain
घरच्या घरी बनवा हॉटेलसारखे Manchow Soup, रेसिपी पाहा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com