Women Health : गर्भधारणेसाठी योग्य वय कोणते? कशी घ्याल काळजी? या गोष्टी लक्षात ठेवा

What is the right age to Family Planning : कामाचा व्याप आणि बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेक तरुणींनी लग्न झाल्यानंतर फॅमिली प्लानिंगचा विचार करत नाही. वय निघून गेल्यानंतर त्यांना मातृत्वाची जबाबदारी घ्यायची असते.
Women Health
Women Health Saam Tv
Published On

Pregnancy Tips :

कामाचा व्याप आणि बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेक तरुणींनी लग्न झाल्यानंतर फॅमिली प्लानिंगचा विचार करत नाही. वय निघून गेल्यानंतर त्यांना मातृत्वाची जबाबदारी घ्यायची असते.

जर तुम्ही देखील पस्तीशीनंतर गर्धधारणेचा विचार करत असाल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. पुण्यातील नोव्हा आयव्हीएफ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ रुपाली तांबे म्हणतात की, वयाच्या पस्तीशीनंतर गर्भधारणेचे नियोजन करताना काही बाबींचा विचार करणे गरजेचे आहे.

वयाच्या 35 नंतरच्या गर्भधारणेत जोखीम आणि गुंतागुंत होणे स्वाभाविक असले तरी, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की या वयोगटातील अनेक स्त्रियांना (Women) निरोगी गर्भधारणा होते आणि ते निरोगी बाळांना जन्म देतात. यामध्ये काही प्रमुख घटक आहेत ज्यांची संभाव्य मातांना जाणीव असणे आवश्यक आहे.

Women Health
तरुणांनो हृदय जपा! या चुकांमुळे येऊ शकतो Heart Attack, लक्षणे दिसल्यास वेळीच व्हा सावध

महिलांचे वय वाढत असताना प्रजनन क्षमता कमी होते, त्यामुळे नैसर्गिकरित्या गर्भधारणा करणे कठीण होते. 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना तरुण स्त्रियांच्या तुलनेत गर्भवती होण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो, त्यामुळे वैद्यकीय (Doctor) सल्ला घेणे आणि प्रजनन उपचारांचा विचार करणे शहाणपणाचे ठरू शकते. तिशीनंतर अंड्यांची संख्या आणि गुणवत्ता देखील कमी होते.

वयस्कर महिलांमध्ये मुदतपूर्व प्रसूतीची शक्यता सर्वसामान्य महिलांच्या तुलनेने अधिक असते ज्यामुळे कमी वजनाची बाळ जन्माला येतात तसेच अकाली बाळ जन्मण्याची शक्यता असते, ज्यामुळे बाळाला (Baby) दीर्घकाळ एनआयसीयूची आवश्यकता भासू शकते.

उशीराने होणाऱ्या गर्भधारणेदरम्यान काही आरोग्य परिस्थितींचा धोका वाढतो. 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना त्यांच्या गर्भावस्थेतील मधुमेह, उच्च रक्तदाब आणि बाळाला डाउन सिंड्रोम सारख्या गुणसूत्रातील विकृती होण्याची शक्यता जास्त असते. या जोखमींविषयी प्रजनन तज्ज्ञांशी चर्चा करणे आणि गर्भधारणेपूर्वी आई आणि बाळाचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी योग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे.

Women Health
Women Health : महिलांनो, गर्धधारणेसाठी IVF चा विचार करताय? योग्य वय किती? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

वाढत्या वयातील गर्भधारणेमुळे बाळाला डाऊन सिंड्रोम सारख्या गुणसूत्र विकृतींचा धोका वाढतो. अनुवांशिक तपासणी चाचण्या गर्भधारणेदरम्यान अशा परिस्थिती लवकर ओळखण्यात मदत करू शकतात.

वाढत्या वयात गर्भधारणेची योजना आखताना तुमच्या एकूण आरोग्याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. संतुलित आहाराचे सेवन करणे, नियमित व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे, तणावाचे व्यवस्थापन करणे आणि तंबाखू किंवा अल्कोहोलसारखे हानिकारक पदार्थ टाळणे यांचा समावेश होतो. सामाजिक दबावामुळे किंवा वैयक्तिक कारणांमुळे आयुष्यात नंतरच्या काळात आई होण्याविषयी चिंता आणि शंका निर्माण होणे स्वाभाविक असले तरी, याचे तणावात रुपांतर होणार नाही याची काळजी घेणे योग्य राहिल.

पस्तीशीनंतर गर्भधारणेचे नियोजन करताना भावनिक आरोग्य महत्त्वाचे ठरते. जसजसे वय वाढते तसतशी अंड्यांची गुणवत्ता तसेच संख्या कमी होत जाते. यासाठी वेळोवेळी तपासणी करणे आणि वेळीच गर्भधारणेचे नियोजन करणे योग्य राहिल.

Women Health
Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचा ड्राय का पडते? Soft Skin साठी या टिप्स फॉलो करा

गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी फर्टिलिटी कन्सल्टंटला भेट देण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरुन तुमचे संपूर्ण मूल्यमापन केले जाऊ शकते आणि आवश्यक हार्मोनल किंवा पोषण सल्ला दिला जाऊ शकतो. जर एखाद्या महिलेला मधुमेह असेल किंवा उच्च रक्तदाब असेल तर तिला गर्भधारणवर परिणाम न करणारी सुरक्षित औषधांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

घटते प्रजनन दर आणि वाढत्या आरोग्य धोक्यांमुळे पस्तीशीनंतर गर्भधारणेचे नियोजन करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला विसरु नका. प्रजनन आरोग्याबाबत तज्ञांचा सल्ला घ्या. प्रत्येक जोडप्याने त्यांच्या पालकत्वाच्या प्रवासाचा आनंद घेण्यासांठी वरील बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. एखाद्याच्या परिस्थितीनुसार विशेषत: अनुकूल उपचार योजना शोधणे गर्भधारणेबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास कारणीभूत ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com