तरुणांनो हृदय जपा! या चुकांमुळे येऊ शकतो Heart Attack, लक्षणे दिसल्यास वेळीच व्हा सावध

Shreyas Talpade Heart Attack : श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याचे चाहते देखील काळजीत पडले आहे. यापूर्वी देखील अनेक बॉलीवूड कलाकारांना हार्ट अटॅक आल्याचे आपल्या माहित आहे. परंतु, इतक्या कमी वयात हार्ट अटॅक येतो कसा? याचे नेमके कारण काय? जाणून घेऊया.
Heart Attack Symptoms
Heart Attack SymptomsSaam tv
Published On

Heart attack Symptoms :

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला. दिवसभराचे शूटिंग संपवून घरी आल्यानंतर त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. मिळालेल्या माहितीनुसार, त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.

अगदी तरुण वयात हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याचे चाहते देखील काळजीत पडले आहे. यापूर्वी देखील अनेक बॉलीवूड कलाकारांना हार्ट अटॅक आल्याचे आपल्या माहित आहे. परंतु, इतक्या कमी वयात हार्ट अटॅक येतो कसा? याचे नेमके कारण काय? जाणून घेऊया.

तज्ज्ञांचे मत आहे की, पाश्चिमात्य लोकांच्या तुलनेत भारतीयांना कोरोनरी आर्टरी डिसीज होण्याचा धोका जास्त आहे. २५ व्या वर्षात किंवा त्यापेक्षा कमी लोकांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येऊ शकतो. बरेचदा हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर आपल्याला सिग्नल देते. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा आपल्या आरोग्यावर (Health) परिणाम होतो. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात काही लक्षणे दिसू लागतात. हृदयविकाराचा झटका किंवा हृदयाशी संबंधित आजाराची सुरुवातीची लक्षणे सांगत आहोत.

Heart Attack Symptoms
Heart Attack Symptoms : अचानक शरीरात होताय हे ५ बदल, येऊ शकतो हृदयविकाराचा झटका; दुर्लक्ष करुच नका
  • सतत बाहरेचे खाणे, हवा बंद डब्यातले पदार्थ आणि साखरयुक्त (Sugar) पदार्थ यामुळे तरुणांमध्ये लठ्ठपणा, उच्च रक्तदाब याचा सामना करावा लागतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

  • कामाच्या व्यापामुळे एकाच जागी बसून केल्यामुळे तसेच शरीराची पुरेशी हालचाल न झाल्यामुळे हृदयविकार आणि रक्तवाहिन्यासंबंधी तंदुरुस्ती कमी होऊ लागते. ज्यामुळे हृदयाच्या समस्या वाढू शकतात.

  • तंबाखूचा वापर, अंमली पदार्थ, अल्कोहोलचे अतिप्रमाणात सेवन करणे यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

1. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी कोणती लक्षणे दिसतात?

  • श्वास घेण्यास अडचण येत असेल किंवा छातीत दुखत असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • तरुणांना हृदयविकाराच्या आधी किंवा दरम्यान छातीत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवू शकते.

  • अचानक बेहोश होणे किंवा कोसळणे हे धोक्याचे लक्षण असू शकते.

  • ह्रदयाचा झटका येण्यापूर्वी हृदयाची अनियमित लय किंवा धडधड जाणवू शकते.

  • चक्कर येणे किंवा गरगरणे, घाम येणे, छातीत दुखणे यांसारखी लक्षणे दिसू लागल्यावर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

  • हृदयाशी संबंधित समस्या असल्यास पचनावरही परिणाम होतो. जर तुम्ही योग्य आहार घेत असाल आणि जीवनशैली (Lifestyle) चांगली असेल, पण पचनक्रिया चांगली नसेल तर त्रास होतो. या समस्यांकडे दुर्लक्ष करु नका.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com