Heart Attack Symptoms : अचानक शरीरात होताय हे ५ बदल, येऊ शकतो हृदयविकाराचा झटका; दुर्लक्ष करुच नका

Heart Attack Reason : कोणतेही आजार होण्यापूर्वी शरीर आपल्याला सिग्नल देऊ लागते. मात्र आपण याकडे दुर्लक्ष करतो. हृदयाशी संबंधित समस्यांच्या बाबतीत शरीर अनेक प्रकारचे सिग्नल देते. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात काही लक्षणे दिसू लागतात.
Heart Attack Symptoms
Heart Attack SymptomsSaam Tv
Published On

Heart Attack Signal :

कोणतेही आजार होण्यापूर्वी शरीर आपल्याला सिग्नल देऊ लागते. मात्र आपण याकडे दुर्लक्ष करतो. हृदयाशी संबंधित समस्यांच्या बाबतीत शरीर अनेक प्रकारचे सिग्नल देते. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात काही लक्षणे दिसू लागतात.

मागच्या वर्षाभरात हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. हृदयविकाराच्या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी. जर अचानक तुम्हाला तुमच्या शरीरात काही बदल जाणवू लागले, तर नक्कीच लक्ष द्या. हृदयविकाराचा झटका किंवा हृदयाशी संबंधित आजाराची सुरुवातीची लक्षणे सांगत आहोत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात दिसतात ही लक्षणे

1. श्वासोच्छवासात बदल

जर तुम्हाला अचनाक तुमच्या श्वासोच्छवासाच्या पद्धतीत काही बदल जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरीरात हृदयाशी संबंधित समस्या असल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. हृदयविकाराचा झटका (Heart attack) येण्यापूर्वी श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.

Heart Attack Symptoms
High Blood Pressure : सायलेंट किलरचा आजार हाय बीपी! झोपेतून उठताच ही लक्षणे दिसल्यास घ्या काळजी...

2. जास्त घाम येणे

जर तुम्हाला बसून किंवा शारीरिक काम न करताही घाम येते असेल तर ते शरीरातील अनेक आजारांचे लक्षण असू शकते. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच जास्त घाम येण्यासारखी लक्षणे दिसतात. विशेषत: रात्री झोपताना तुम्हाला घाम येऊ लागल्यास, डॉक्टरांचा (Doctors) सल्ला घ्यावा.

3. शरीराची डावी बाजू कमकुवत होणे

शरीराच्या डाव्या बाजूला अशक्तपणा जाणवत असेल. जर तुम्हाला तुमच्या हातात दुखत असेल, तुमच्या खांद्यावर आणि जबड्यात अशक्तपणा जाणवत असेल तर ते धोकादायक असू शकते. जेव्हा हृदय योग्यरित्या कार्य करत नसेल तेव्हा अशा समस्या उद्भवू शकतात.

Heart Attack Symptoms
Heart Care Tips : हृदयाला निरोगी ठेवायचे आहे? या ७ गोष्टी लक्षात ठेवा, बीपीही राहिल नियंत्रणात

4. सहज थकवा जाणवणे

कोणत्याही शारीरिक हालचालीशिवाय तुम्हाला खूप थकवा जाणवत असेल तर ही समस्या असू शकते. शरीरात थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. कोणतेही काम केल्यानंतर लगेच दम लागतो.

5. पचन मंदावते

हृदयाशी संबंधित समस्या असल्यास पचनावरही परिणाम होतो. जर तुम्ही योग्य आहार घेत असाल आणि जीवनशैली (Lifestyle) चांगली असेल, पण पचनक्रिया चांगली नसेल तर त्रास होतो. या समस्यांकडे दुर्लक्ष करु नका.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com