Heart Care Tips : हृदयाला निरोगी ठेवायचे आहे? या ७ गोष्टी लक्षात ठेवा, बीपीही राहिल नियंत्रणात

How To Control Blood Pressure : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, कॅफिनीचे अतिप्रमाणात सेवन, अपुरी झोप यामुळे हृदयविकाराचे आजार जडताना दिसून येत आहे.
Heart Care Tips
Heart Care TipsSaam Tv
Published On

Healthy Heart Tips :

आजच्या धकाधकीच्या जीवनात हृदयासंबंधिचे आजार सहज होतात. हल्ली हृदयविकाराच्या समस्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, कॅफिनीचे अतिप्रमाणात सेवन, अपुरी झोप यामुळे हृदयविकाराचे आजार जडताना दिसून येत आहे.

परंतु, हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतल्यास अनेक आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. त्यासाठी कोणत्या ७ गोष्टी लक्षात ठेवायला हव्या हे जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. आहार

हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक अन्नपदार्थ. यामध्ये तुम्ही धान्य, शेंगा, हंगामी फळे, नट्स, बिया आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करायला हवा.

Heart Care Tips
Air Pollution Affect Lung Cancer : फुफ्फुसाचा कर्करोग असणाऱ्यांना वाढत्या प्रदूषणाचा धोका! कशी घ्याल काळजी?

2. पुरेशी झोप घ्या

निरोगी हृदयासाठी ताणतणाव (Stress) घेणे कमी करायला हवे. यासाठी पुरेशी झोप घ्यायला हवी. ज्यामुळे ब्लड प्रेशर (Blood-Pressure) नियंत्रणात राहिल. ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घेतल्याने ताण कमी होईल. तसेच मनाला शांतीही मिळेल. ज्यामुळे हृदय निरोगी राहिल.

3. योग आणि व्यायाम

हृदय निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे योगा आणि व्यायाम करा. यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जात्मक वाटेल. तसेच दिवसातून किमान अर्धा ते एक तास नियमित योगासने (Yoga) करायला हवेच.

4. ग्रीन टी प्या

ग्रीन टीचे नियमितपणे सेवनाने सिस्टोलिक आणि डायस्टोलिक बीपी दोन्ही नॉर्मल ठेवण्यास मदत होते. ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. ज्यामुळे हृदय निरोगी राहाण्यास मदत होते.

Heart Care Tips
Dehydration In Winter Season : हिवाळ्यात पाणी कमी पिताय? आरोग्याला होऊ शकते नुकसान

5. वजन नियंत्रणात ठेवा

वाढत्या वजनाला नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी हृदयाच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे. यासाठी तुमच्या उंचीनुसार वजन ठेवा.

6. मासे खा

ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असते ज्यामुळे कोलेस्ट्रॉल राखण्यास मदत करते. त्यासाठी सॅल्मन आणि ट्यूना सारख्या ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असलेले मासे खा. यामुळे हृदय निरोगी राहाण्यास मदत होईल.

7. मद्यपान नको

धुम्रपान आणि अतिमद्यपान केल्याने हृदय, फुफ्फुस आणि यकृताशी संबंधित अनेक गंभीर आजार होण्याची भीती असते. त्यामुळे मद्यपानाचे सेवन कमी करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com