देशात सर्वात जास्त रुग्ण डायबिटीजचे (Diabetes)असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक लोकांना डायबिटीज आजार झाला आहे. डायबिटीजच्या रुग्णांना अनेक पत्थे पाळावी लागतात. त्यांनी आहारात गोड पदार्थ खायचे नसतात. त्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांनी डार्क चॉकलेट खावे की नाही असा प्रश्न असतो. डार्क चॉकलेट खालल्याने शुगर लेव्हल वाढते असे अनेकांना वाटते.
चॉकलेटमध्ये जास्त प्रमाणात फॅट आणि कॅलरीज असतात. त्यामुळे वजन आणि कोलेस्ट्रॉल वाढते. त्यामुळे चॉकलेट खाणे टाळावे. परंतु डार्क चॉकलेट खाणे शरीरासाठी चांगले असते.
डार्क चॉकलेटमध्ये ७० टक्के कोको पावडर (Coco Powder) आणि कमी प्रमाणात साखर असते. त्यामुळे तुम्ही हे चॉकलेट खाऊ शकतात. परंतु जास्त प्रमाणात हे चॉकलेट खालल्याने शरीराला त्रास होऊ शकतो. डार्क चॉकलेटमध्ये पॉलीफ्लोन असतात. जे अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करतात. यामुळे रक्तातील शुगर लेव्हल (Sugar Level)नियंत्रणात राहते.
डार्क चॉकलेटमध्ये (Dark Chocolate)खूप जास्त पोषण असते. त्यामुळे ते शरीरासाठी फायदेशीर असतात. चॉकलेटमधील कॅफिन तणाव दूर करण्यास मदत करते. डार्क चॉकलेटमध्ये थिओब्रामइन नावाचा रासायनिक पदार्थ असतो. त्यामुळे सर्दी खोकला कमी होतो. डार्क चॉक्लेट कोको बीन्सपासून बनवले जाते. त्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते. तसेच डार्क चॉक्लेटमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स हृदयासाठी फायदेशीर असतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.