Work Life : तुम्ही एका दिवसात किती वेळ काम केले पाहिजे? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

Working Hours : आजच्या व्यस्त जीवनात लोक त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे विसरले आहेत. विशेषत: जे काम करत आहेत, त्यांना स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे थोडे कठीण होते. ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना कामाचा ताण तर असतोच, पण काही वेळा डेडलाईनमुळे कामाचे तासही वाढतात.
Work Life Balance
Work Life BalanceSaam Tv
Published On

Work Life Balance : 

आजच्या व्यस्त जीवनात लोक त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे विसरले आहेत. विशेषत: जे काम करत आहेत, त्यांना स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे थोडे कठीण होते. ऑफिसमध्ये काम (Work) करणाऱ्यांना कामाचा ताण तर असतोच, पण काही वेळा डेडलाईनमुळे कामाचे तासही वाढतात. याआधी प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती म्हणाले होते की, तरुणांनी 70 तास काम करावे.

त्यांच्या या वक्तव्यापासून एखाद्या व्यक्तीने एका दिवसात किंवा आठवड्यात किती काम करावे, यावर वाद सुरू झाला आहे. असं असलं तरी, कामाच्या प्रचंड ताणामुळे बहुतेक लोकांमध्ये तणाव आणि नैराश्य वाढत आहे. अशा स्थितीत माणसाने किती काम करावे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. यासंदर्भात द योगा (Yoga) इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. हंसाजी योगेंद्र यांचे मत जाणून घेऊया.

फोकस वाढतो

डॉ.हंसाजी योगेंद्र म्हणतात की, तरुणांसाठी मेहनत आवश्यक आहे. तुमची आंतरिक प्रेरणा उत्साह आणि शिस्तीला प्रोत्साहन देते, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक कार्य काळजीपूर्वक करण्याचा प्रयत्न करता. डॉ.हंसाजी सांगतात की, जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये काम करता तेव्हा कामाच्या दबावामुळे तुमचे लक्ष वाढते. तुम्ही प्रत्येक परिस्थिती हाताळायला शिका.

Work Life Balance
Mental Health At Workplace : ऑफिसमधील वातावरणामुळे मानसिक आरोग्यावर होतो 'हा' परिणाम; जाणून घ्या कारणं

किती तास काम करावे?

कोणतेही कार्यालय किंवा संस्था सामान्यतः आपल्या कर्मचाऱ्यांना 8 ते 9 तास काम करायला लावते. परंतु कामाच्या जीवनात समतोल राखण्यासाठी, आपल्या क्षमतांचे मूल्यांकन करणे तसेच वैयक्तिक मर्यादा लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कामाव्यतिरिक्त शारीरिक आणि मानसिक आरोग्यालाही प्राधान्य देणे गरजेचे आहे. सततच्या कामाच्या ओझ्यामुळे तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल राखणे गरजेचे आहे.

Work Life Balance
Chanakya Niti On Work Plan : काम पूर्ण होण्यापूर्वी तुमचे प्लान इतरांना शेअर करू नका, वाचा सविस्तर

योगासनही महत्त्वाचे आहे

मात्र, डॉ.हंसाजी योगेंद्र असेही सांगतात की, तुमच्या झोपेवर अनेक गोष्टी अवलंबून असतात. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली तर तुम्ही 8 किंवा 9 तासांपेक्षा जास्त वेळ काम करू शकता. पण उत्पादकता वाढवण्यासाठी झोपेसोबतच ताण व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत उत्पादकता वाढवण्यासाठी योगाभ्यास करणे खूप फायदेशीर ठरू शकते. याच्या मदतीने तुम्ही कामाच्या ठिकाणीही सक्रिय राहून तुमची सर्व कामे सहज पूर्ण करू शकाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com